Header Ads Widget

Responsive Image

अमळनेर :- आझाद नायक न्युज विकी भावसार,पंकज भावसार संत सखाराम महाराज यात्रा मार्गावर तातडीने प्रकाश व्यवस्था; नागरिकांकडून अधिकाऱ्यांचे जाहीर आभार..

अमळनेर : संत सखाराम महाराज यात्रेच्या मार्गावर काल रात्री प्रकाश व्यवस्था नसल्यामुळे भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अंधारामुळे यात्रेतील वातावरणात काही प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली होती.
या बाबीची गांभीर्याने दखल घेत आज माननीय मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे साहेब तसेच विद्युत अभियंता श्री. कुणाल महाले साहेब यांनी तात्काळ हालचाल करत यात्रेच्या संपूर्ण मार्गावर एलईडी हॅलोजन दिव्यांची व्यवस्था केली. तसेच जय बजरंग व्यायाम शाळेसमोरही आवश्यक प्रकाश व्यवस्था करण्यात आली.
या तत्पर आणि जबाबदार कामगिरीमुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला असून यात्रेचा आनंद अधिक सुरक्षित आणि सुखकर झाला आहे. या उत्कृष्ट कार्याबद्दल माजी उपनगराध्यक्ष चंदुसिंग परदेशी,यात्रेतील दुकानदार व नागरिकांकडून संबंधित अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक जाहीर आभार व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments