Header Ads Widget

Responsive Image

अमळनेरात गोळी लागून तरुणाचा मृत्यू; परिसरात खळबळ!

 अमळनेर :- आझाद नायक न्युज       विकी भावसार,परेश उदेवाल 

 अमळनेरात गोळी लागून तरुणाचा मृत्यू; परिसरात खळबळ!
  आमलेश्वर नगर भागातील दुर्दैवी घटना; गावठी कट्टा हाताळताना अपघाताची शक्यता
 अमळनेर, शहरातील आमलेश्वर नगर परिसरात आज रात्री सुमारे सव्वा नऊ वाजेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली असून,कुबेर मंडप डेकोरेशनचे संचालक,अरुण सुरेश महाजन या तरुणाचा गोळी लागून मृत्यू झाल्या ने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. 
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुण हा गावठी कट्टा हाताळत असताना अचानक गोळी सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, नेमका प्रकार कसा घडला, हा अपघात होता की काही वेगळा प्रकार, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. 
 सदर अरुणच्या पाठीमागे आई,वडिल,भाऊ,पत्नी,2 मुली व बराच आप्त परिवार आहे. 
   घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसर पंचनामा करून तपास सुरू केला असून, अधिक तपशील गोळा करण्यात येत आहेत.
या प्रकरणात सर्व शक्यता तपासल्या जात असून, मृत्यूमागील खरे कारण शोधण्यासाठी पोलीस कसून चौकशी करत आहेत.
तरुणाच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments