दि. ०८.सप्टेंबर २०२५
गुलजार पुरा जुने शहर अकोला येथे एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय गणेश विसर्जना साठी गेले असता एका २४ वर्षीय नराधम आरोपीने घरात घुसून चाकूचा धाक दाखवत मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्या आरोपीला तात्काळ पकडून फाशीची शिक्षा द्या जेणे करून इतयांना शिक्षा मिळेल, वाढती महागाई कमी करा, जन सुरक्षा अधिनियम रद्द करा व महाराष्ट्र राज्यात जिल्हा जिल्ह्यात अंगणवाडी कर्मचारी टी एच आर आहार बंद करून गरम ताजा आहार किंवा कडधान्य स्वरूपात महाराष्ट्रातील जनतेला द्यावा व मातृ वंदन योजना एक लाडकी बहीण योजना एफआरएस प्रणालीवर काम करण्याचा बहिष्कार टाकुण आंदोलने सुरू आहेत अकोला जिल्ह्यात आज कॉम्रेड नयन गायकवाड यांच्या मार्गदर्शनात व कॉम्रेड रमेश गायकवाड व कॉम्रेड सुनीता पाटील यांच्या नेतृत्वात दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी महिला व बाल कल्याण भवन येथे अकोला जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी घडकले आणि तीव्र निदर्शने आंदोलन करत म्हणाले की जर बालविकास प्रकल्प अधिकारी व सुपरवायझर मुख्य सेविका यांनी काम करण्यास दबाव टाकला तर त्यांना घेराव आंदोलन व इतर तीव्र आंदोलन करण्यात येईल. वाढती महागाई महाराष्ट्रातील जनतेला गरम ताजा आहार देण्यात यावा, आंदोलन मातृ वंदन, लाडकी बहीण व इतर योजनेच्या बाह्य योजनेचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सांगण्यात येऊ नये सरसकट २०००/- रुपये प्रोत्साहन भत्ता मानधन वेतना सोबतच देण्यात यावा, उपदान ग्रॅज्युटी व प्रस्तावित असलेली पेन्शन त्वरित लागू करण्यात यावी, जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न त्वरित सोडून द्यावे अन्यथा १ ऑक्टोबर २०२५ पासून बेमुदत संप अंगणवाडी कर्मचारी करणार अशी नोटीस वजा निवेदन आंदोलन द्वारे दिले आहे आंदोलनात कॉ. रमेश गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष राज्य कौन्सिल सदस्य,कॉ.सुनीता पाटिल जिल्हा अध्यक्षा व राज्य सचिव.कॉ. नयन गायकवाड राज्य संघठन सचिव.व जिल्हा सचिव,कॉ. सुरेखा ठोसर
कॉ. दुर्गा देशमुख,
कॉ.सरोज मुर्तिजापूरकर,
कॉ.ज्योती ताथोड सहसचिव,
कॉ. महानंदा ढोक, कॉ. सुनंदा पदमने, कॉ. मंगला अढावु, कॉ. कल्पना महल्ले, कॉ. वंदना डांगे, कॉ. माधुरी परणाटे, कॉ.उषा महले,
कॉ. सुमित गायकवाड,
कॉ. प्रिया वरोटे, कॉ. प्रिया गजभिये, कॉ. बाली साबळे, सर्व तालुका व जिल्हा कार्यकारिणी अकोला जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments