आझाद नायक न्युज :- संपादक
विकी भावसार, कार्यकारी संपादक : पंकज भावसार
सबगव्हाण (ता. पारोळा) : धुळे–पारोळा मार्गावरील सबगव्हाण टोल नाक्याजवळ एलपीजी रसायन वाहतूक करणाऱ्या गॅस टँकरचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत टँकर चालकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टँकरचा टायर अचानक फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर टँकरच्या कॅबिनला आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दल व स्थानिक प्रशासनाने तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली.
सुदैवाने टँकरमधील एलपीजी रसायन साठवलेल्या मुख्य टँकपर्यंत आगीचा भडका पोहोचला नाही. त्यामुळे संभाव्य मोठा स्फोट आणि भीषण जीवितहानी टळली.
या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा व पुढील तपास सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण आणि मृत चालकाची ओळख अधिकृतरीत्या स्पष्ट होणे बाकी आहे.
0 Comments