Header Ads Widget

Responsive Image

अंमळनेरच्या अरविंदला पुण्यातून ड्रग्स विक्री करतांना अटक

अंमळनेरच्या अरविंदला पुण्यातून ड्रग्स विक्री करतांना अटक..


पुणे शहरातील विमाननगर येथील नामांकित महाविद्यालया जवळ कुख्यात गुन्हेगारावर कारवाई करून विमानतळ पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल एक कोटी सात लाख दहा हजार रुपयांचे मेफेड्रॉन (एमडी) जप्त केले.त्याला न्यायालयाने ६ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.अरविंद रवींद्र बिर्‍हाडे(रा.अमळनेर,जि.जळगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरविंद बिर्‍हाडे हा अमळनेर मधील सराईत गुन्हेगार आहे. दरम्यान विमानतळ पोलिस ठाण्यातील अंमलदार सचिन जाधव यांना बातमी दारामार्फत माहिती मिळाली की एकजण सिंबायोसिस महाविद्यालया जवळ संशयितरित्या उभा असून त्याच्याकडे अमली पदार्थ आहे. त्यानुसार त्याला सापळा रचून पकडले.
ही कारवाई पोलिस उप आयुक्त रोहिदास पवार,वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव,पोलिस निरीक्षक (गुन्हे) मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे, अविनाश शेवाळे, सचिन कदम, गिरीश नाणेकर,अंकुश जोगदंडे संजय असवले यांच्या पथकाने केली.

आरोपी अरविंद बिर्‍हाडेला २०१६ मध्ये अंमळनेर येथे एका गुन्ह्यात पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने पोलिस चौकी जाळण्याचा प्रयत्न केला होता व यात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले होते, असे विमानतळ पोलिसांनी सांगितले.

अंमळनेर येथील एका माजी
नगरसेवकावर खुनी हल्ला करून तो मागील आठ महिन्यांपासून फरार झालेला होता. पुण्यात एमडी ( MD) हा अंमली पदार्थ कोणाला तरी देण्या करिता तो आला होता. याबाबत पोलिस तपास करत आहेत. एका पंजाबी ट्रकचालकाने त्यास सदर अंमली पदार्थ दिल्याची माहिती दिली.

Post a Comment

0 Comments