Header Ads Widget

Responsive Image

आझाद नायक न्युज :- अमळनेर विकी भावसार,पंकज भावसार अमळनेर भावसार समाजाने वह्या पुस्तक देऊन प्रोत्साहित केले व यशाचे शिखर गाठले....

अमळनेर : जिद्द, मेहनत आणि समाजाप्रती कृतज्ञता यांचा सुंदर संगम दाखवणारे उदाहरण म्हणजे श्री सुरेश सिताराम शेठ भावसार (सध्या मुक्काम जव्हार, जि. पालघर).
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अमळनेर येथे त्यांचे बालपण व शिक्षण सुरू होते. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. 
मात्र, अशा कठीण काळात भावसार समाजाने त्यांना पुस्तके व वह्या देऊन शिक्षणासाठी मोलाची मदत केली. या मदतीच्या बळावर त्यांनी हार न मानता आपले शिक्षण पूर्ण केले.
त्यांच्या चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर त्यांना जव्हार येथे जिल्हा परिषदेत नोकरी मिळाली. यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही त्यांनी आपल्या संघर्षमय दिवसांची आणि समाजाने दिलेल्या आधाराची आठवण जपली.
समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी अमळनेर भावसार समाजाला रुपये 21,000/- ची देणगी दिली. त्यांची ही उदार आणि प्रेरणादायी कृती समाजासाठी अभिमानास्पद ठरत असून, तरुण पिढीसाठी एक आदर्श निर्माण करणारी आहे.
"जिथे संकटे येतात, तिथेच संधीही जन्म घेतात; आणि जिद्दीने चालणारा माणूसच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो," याची प्रचिती श्री सुरेश भावसार यांच्या जीवनप्रवासातून येते.
अमळनेर भावसार समाज कार्यकारिणी मंडळाकडुन सदर  दामपात्यांचा सत्कार करून त्यांना दीर्घायुष्याचा शुभेच्छा दिल्या 

Post a Comment

0 Comments