कोणाच्या कृपा आशीर्वादाने एव्हढे डम्पर अमळनेर मध्ये चालत आहेत
अमळनेर:- आझाद नायक न्युज,
विकी भावसार,परेश उदेवाल,
भरधाव क्रेनची सिंधी व्यवसायिकाला जोरदार धडक;चालक मद्यधुंद अवस्थेत अपघातानंतर चालक फरार...
अमळनेर (प्रतिनिधी):- शहरात आज दुपारी अपघाताची एक थरारक घटना घडली. अमळनेर-चोपडा रोडवरील श्री गजानन महाराज मंदिराजवळ एका भरधाव क्रेनने सिंधी समाजातील एका व्यावसायिकला भीषण धडक दिली.
सुरुवातीला हा अपघात डंपरमुळे झाल्याची चर्चा शहरभर रंगली होती, मात्र प्रत्यक्षात क्रेनने हा अपघात घडवून आणल्याचे समोर आले आहे.
आज दुपारी साधारण १२ वाजेच्या सुमारास अमळनेर-चोपडा रस्त्यावरून एक क्रेन अत्यंत वेगाने जात होती. गजानन महाराज मंदिराजवळ क्रेनने एका सिंधी व्यवसायिकाला जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, धडक इतकी भीषण होती की व्यवसायिक गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांचा जीव धोक्यात आहे. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
अपघात घडल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. क्रेन चालक प्रचंड मद्यधुंद अवस्थेत होता, असे तेथील नागरिकांनी सांगितले. अपघात होताच चालक क्रेनसह पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. दरम्यान, "डंपरने धडक दिली" अशी अफवा वाऱ्यासारखी शहरात पसरली होती, मात्र नंतर क्रेननेच अपघात केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे केवळ चालकावरच नव्हे, तर क्रेन मालकावरही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
"बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांमुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. अशा मद्यधुंद चालकांना आणि नियम धाब्यावर बसवणाऱ्या मालकांना कायमस्वरूपी धडा शिकवण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलावीत.
अमळनेर मध्ये एवढी डम्पर कोणाच्या आशीर्वादाने चालत आहेत.व यावर पोलीस प्रशासन काही नियम का लावत नाही आहेत. तसेच अश्याप्रकारच्या जड वाहनांना वेळेचे बंधन घालण्यात यावे असा नाराजीचा सूर नागरिकांमधून उमटत आहे.
0 Comments