Header Ads Widget

Responsive Image

अमळनेर :- आझाद नायक न्युज अमळनेरचे ग्राम दैवत प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या अमळनेर च्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला भीषण आग

आझाद नायक न्यूज अमळनेर
पंकज भावसार
मुख्य कार्यकारी संपादक
अमळनेर : प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या अमळनेर शहराच्या धार्मिक आस्थेचे प्रतीक असलेल्या संत सखाराम महाराज वाडी संस्थान येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याला आज भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आग इतकी भीषण होती की मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आतील अनेक वस्तू जळून खाक झाल्या. घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी झाली आणि भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमळनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्न केले. 
यावेळी अमळनेर शहरातील वाडी चौक, पैलाड, पानखिडकी, माळीवाडा, भोईवाडा, पवन चौक, मंगलादेवी चौक, तसेच विविध भागातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित राहून आग विझविण्यास मोलाचे सहकार्य केले.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, सर्व काही जळाले... पण देवमूर्ती सुरक्षित!
आगीत गाभाऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी संस्थानातील देवमूर्ती सुरक्षित राहिल्याचे पाहून अनेक भाविकांनी आश्चर्य आणि समाधान व्यक्त केले.
दरम्यान, आगीचे नेमके कारण शॉर्ट सर्किट मुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यातयेत असले तरी संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments