Header Ads Widget

Responsive Image

अकोला :- आझाद नायक न्युज,मुकेश भावसार,भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आयटक व युथ फेडरेशन सहभाग होऊन पाठिंबा

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिक्षक बचाव समिती अकोला यांच्या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आयटक व युथ फेडरेशन सहभाग होऊन पाठिंबा देण्यात आला.

अकोला, २०.०७.२०२६ : लडाखचे पर्यावरणवादी व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या CJP च्या नीट पेपर फुटी जबाबदारी शिक्षणमंत्र्यांनी घ्यावी आणि त्यांचा राजीनामा व्हावा महाराष्ट्रात व इतर राज्यात आणि भारत देशात यानंतर अशी परिस्थिती परत उद्भवणे म्हणून ज्या मागण्या केंद्र सरकार समोर मांडण्यात आंदोलन अनेक दिवसांपासून जंतरमंतर दिल्ली येथे सुरू आहे आज सदर आंदोलन पार्लमेंट मार्च असे मोठ्या स्वरूपाचा आंदोलन होत असून या आंदोलनाला जिल्हा जिल्ह्यात पाठिंबा देण्याच्या अनुषंगाने आज राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गट, शिक्षण बचाव समिती अकोला यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलन ठेवले होते सदर आंदोलनात सहभागी होऊन या आंदोलनाला पाठिंबा देऊन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप), आयटक कामगार संघटना आणि ऑल इंडिया युथ फेडरेशन (AIYF) यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला येथे निषेध मोर्चा व आंदोलन करण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम कार्यालयापासून आंदोलनच्या पेंडॉल स्टडी मोर्चा काढण्यात आला. आंदोलनात सहभाग घेऊन निदर्शने करण्यात आली.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी मोदी सरकार घाबरले... भ्याड दंडेलशाहीचा धिक्कार, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या आत्महत्या केलेल्या विद्यार्थी यांच्या परिवार यांना नुकसान भरपाई द्या अशा घोषणा देत केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या २० दिवसांपासून शांततामय व लोकशाही मार्गाने उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना खाजगी रुग्णालयात सुद्धा भरती करण्यात यावे तसेच आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करून AISF ऑल इंडिया स्टुडन्ट फेडरेशन ऑल इंडिया विथ फेडरेशन AIYF विद्यार्थी युवकांना धरपकड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कॉम्रेड नयन गायकवाड यांच्या व्दारे सांगण्यात आले की, लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाशी कोणतीही चर्चा न करता दडपशाहीचा मार्ग स्वीकारणे हे संविधानिक मूल्यांवर आघात करणारे असून अशा प्रकारच्या कारवाईचा आम्ही तीव्र निषेध करतो. आंदोलनकर्त्यांचा आवाज दाबण्या ऐवजी केंद्र सरकारने संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवावेत, अशी मागणीही करण्यात आली.
निवेदनात सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, आंदोलनकर्त्यांवरील कारवाई थांबवावी आणि लोकशाही मार्गाने तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनात कॉ. नयन गायकवाड, कॉम्रेड मायावती बोरकर, कॉ. रक्षा कठाणे, कॉ. मनीषा बनसोड, पारस आगरकर, कॉ. अश्विनी सूर्यवंशी, कॉ. नीता कठाणे, कॉ. पूजा बोरकर, कॉ. सुजाता मेश्राम, कॉ. आरती बोबडे, कॉ. माया सूर्यवंशी, सुनिता जाधव, कॉ. शितल दांडी, कॉ. वंदना साळवे, कॉ. प्रवीण मनवर, कॉ. वंदना मोरे, कॉ. प्रज्ञा प्रधान, कॉ. शीला कात्रे, कॉ. नीता पोहरे, कॉ. वैशाली गुडदे, कॉ. सीमा गवई, कॉ. भारती बसे, कॉ. अलका चोपडे, कॉ. संगीता माळी, कॉ. दीपा निमजे, कॉ. विना घाटोड, कॉ. लक्ष्मी साकडे, कॉ. दिपाली गावंडे, कॉ. रश्मी पहाडिया, कॉ. पुनम शेळके सह भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आयटक कामगार संघटना व ऑल इंडिया युथ फेडरेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक संख्येने सहभागी झाले.

Post a Comment

0 Comments