Header Ads Widget

Responsive Image

अमळनेर कोर्टाचा निर्णय माजी नगराध्यक्षासह २५ नगरसेवक यांच्यावर कारवाईचा आदेश....

 अमळनेर :- आझाद नायक न्युज
विकी भावसार,परेश उदेवाल 

 माननीय न्यायालयाचा मोठा धक्का – पोलिसांचा B-समरी रिपोर्ट फेटाळला! 
तत्कालीन प्रांतात तसीलदार मुख्याधिकाऱ्यांच्या समावेश
 अमळनेर शहरात एक मोठा आणि धक्कादायक घडामोडींचा उलगडा झाला आहे. राजकुमार छाजेड विरुद्ध मोहन सातपुते या प्रकरणात माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे संपूर्ण प्रकरणाला नवा कलाटणी मिळाली आहे.
 अमळनेर पोलीस स्टेशनने दाखल केलेला B-समरी रिपोर्ट (खोटा तक्रार म्हणून दाखवलेला अहवाल) न्यायालयाने सरळ नाकारला (Rejected) आहे.
काय आहे प्रकरण?
तक्रारदाराने आरोप केला होता की सुमारे 500 चौ. फूट जागेवर अतिक्रमण करण्यात आले.
तसेच बनावट कागदपत्रे व खोटी प्रतिज्ञापत्रे सादर करून गुन्‍ठेवारी नियमितीकरण मिळवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.
विशेष म्हणजे, या प्रकरणात माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार FIR नोंदवण्यात आली होती.
न्यायालयाचे निरीक्षण
न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की, पोलिस तपासात महत्त्वाच्या पुराव्यांकडे दुर्लक्ष झाले असण्याची शक्यता आहे.
 तक्रारदाराच्या कागदपत्रांमध्ये व टाउन प्लॅनिंग रेकॉर्डमध्ये मोठा तफावत (discrepancy) आहे.
   त्यामुळे प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक आहे.
 न्यायालयाचा ठोस आदेश
 B-समरी रिपोर्ट क्र.35/2023 फेटाळण्यात आला
 तक्रारदाराची प्रोटेस्ट पिटिशन आता फौजदारी तक्रार म्हणून स्वीकारली जाणार
 संबंधित अधिकाऱ्यांना पुढील कारवाईचे निर्देश
 काय सूचित होते?
हा आदेश स्पष्टपणे दर्शवतो की –
 पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे
 प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला का? असा संशय निर्माण झाला आहे
 आता संबंधितांवर कायद्याचा फास आवळण्याची शक्यता वाढली आहे
अमळनेर नगरपरिषद चे मुख्याधिकारी व नगरपालिकेचे बांधकाम अभियंता व माननीय तहसीलदार साहेब व प्रांत साहेब व तत्कालीन नगराध्यक्ष सह पंचवीस नगरसेवकां वरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश आज रोजी आदेश माननीय अमळनेर न्यायालयाने पारित केले आहे.

Post a Comment

0 Comments