अमळनेर :- आझाद नायक न्युज
विकी भावसार,पंकज भावसार
अमळनेरमध्ये संत सखाराम महाराज यात्रा उत्सवात इंधन टंचाई; पेट्रोल पंप धारकांना वेळ वाढवण्या चे आवाहन
अमळनेर शहरात सध्या संत सखाराम महाराज यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरू आहे.
या उत्सवानिमित्त ग्रामीण भागातून तसेच बाहेरगावाहून मोठ्या प्रमाणात भाविक अमळनेरमध्ये दाखल होत आहेत.
दिवसभरातच नव्हे तर विशेषतः रात्रीच्या वेळी पेट्रोल व डिझेल मिळणे कठीण झाले असून, यामुळे भाविक व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बाहेरगावाहून आलेल्या अनेक नागरिकांनी इंधन उपलब्ध नसल्यामुळे गैरसोयी होत असल्याची तक्रार व्यक्त केली आहे.
आझाद नायक चे कार्यकारी संपादक पंकज भावसार यांच्याशी संवाद साधताना काही भाविकांनी सांगितले की, “पेट्रोल-डिझेल सहज उपलब्ध नसल्याने प्रवासात अडथळे येत आहेत. काही जण तर या भीतीमुळे यात्रा उत्सवात येणे टाळत आहेत.”
या पार्श्वभूमीवर अमळनेरमधील सर्व पेट्रोल पंप धारकांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी तातडीने पुरेसा इंधन साठा उपलब्ध करून द्यावा. तसेच, नागरिक व भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पेट्रोल पंप रात्री किमान १२ ते १ वाजेपर्यंत सुरू ठेवावेत.
यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांना दिलासा मिळेल आणि यात्रा उत्सव अधिक सुरळीत पार पडण्यास मदत होईल.
0 Comments