परेश उदेवाल
आज रोजी अमळनेर शहरात आजी-माजी सैनिकांचे खान्देशी रक्षक फाउंडेशन यांच्याकडून वाढत्या गर्मीचा प्रकोप पाहता आणि प्रभू श्रीराम नवमी व तसेच जळगाव लोकसभेच्या लाडक्या खासदार माननीय स्मिता ताई वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर शहरात पाणपोईला सुरुवात करण्यात आली.
या पाणपोई चे विशेष असे की या ठिकाणी शुद्ध व थंड असे Aqua जारचे पाणी सुरक्षा रक्षकाच्या देखभालीत पाणी वाटप करण्यात येते व याचा लाभ ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी विद्यार्थिनी शेतकरी बांधव तसेच गोर गरीब व गरजू नागरिकांना होत असतो,या पाणपोईचे उद्घाटन अमळनेर नगर पालिकेचे मा.नगरसेवक व माजी सैनिक श्री सचिन बळवंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित मा. नगरसेवक प्रताप आबा छबुलाल साळी मा.नगरसेवक श्री चंदूसिंह नाना परदेशी तसेच खान्देश रक्षक फाउंडेशनचे, अध्यक्ष विजय सूर्यवंशी,शहराध्यक्ष धनराज पाटील मा.सैनिक शिवदास शेटे,रामकृष्ण पाटील जयदीप राजपूत, प्रवीण पाटील, अंकुश पाटील रोकडे सर
माननीय नगरसेवक सचिन बळवंत पाटील यांच्या शुभहस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले नागरिकांना 24 तास मिळावे म्हणून Aqua जार सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
0 Comments