Header Ads Widget

Responsive Image

आझाद नायक न्युज :- ​अकोल्यात डॉ. पूजा खेतान यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न..

​अकोला (प्रतिनिधी):- आझाद नायक न्युज,मुकेश भावसार
 
सुमिरामा फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. पूजा खेतान यांच्या वाढदिवसा चे औचित्य साधून २१ जून २०२६ रोजी अकोला शहरात भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 'एक झाड लावूया, पर्यावरण वाचवूया' हा संदेश देत फाउंडेशनच्या वतीने निसर्गाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
​हा वृक्षारोपण कार्यक्रम २१ जून रोजी सकळी ११ वाजताच्या सुमारास अकोल्यातील नेहरू पार्क व गो-संस्थान परिसर जवळील गजानन महाराज मंदिर परिसरात पार पडला. दर वर्षी प्रमाणे यंदाही झाडे लावून वाढदिवस साजरा करण्याचा एक स्तुत्य आणि आदर्श उपक्रम सुमिरामा फाउंडेशनच्या वतीने राबवला गेला. पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी पुढे येणे ही काळाची गरज असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त करण्यात आले.
​या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमात सुमिरामा फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. पूजा खेतान यांच्यासह अनेक मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यामध्ये प्रामुख्याने कीर्ती काळे, श्रुती सदनशिव, रेणुका झिरपे, ममता खंडारे, विशाल धांडे, चेतन देशमुख, आकाश सूर्यवंशी, आनंद गाढे, नंदकिशोर गावंडे, प्रवीण काळे, संजय ठोके, विक्की मोरे, सागर शिंदे, विठ्ठल लोखंडे, विजू बोरे आणि आशिष खिल्लारे आदी उपस्थित होते.
​उपस्थित सर्व मान्यवरांनी केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या रोपट्यांचे संगोपन व जतन करण्याचा संकल्पही या वेळी केला. डॉ. पूजा खेतान यांच्या या अनोख्या आणि पर्यावरणपूरक वाढदिवसाच्या उपक्रमाचे अकोला शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments