Header Ads Widget

Responsive Image

अमळनेरात धाडसी घरफोडी; पावणे नऊ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

आझाद नायक न्यूज, अमळनेर (महाराष्ट्र)
 पंकज भावसार
मुख्य कार्यकारी संपादक

अमळनेरात धाडसी घरफोडी; पावणे नऊ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

जिनगर गल्लीतील तिसऱ्या मजल्यावरील घर फोडून अज्ञात चोरट्यांचा हातसफाईचा प्रकार

अमळनेर, दि. २१ : अमळनेर शहरातील सराफ बाजार परिसरातील जिनगर गल्ली येथे अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत तब्बल ८ लाख ६६ हजार ६८ रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छगन चुडामन बिऱ्हाडे (रा. सराफ बाजार एकतानगर, जिनगर गल्ली, अमळनेर) हे आपल्या पुतण्याच्या साखरपुड्यासाठी २० जून रोजी रात्री घराला कुलूप लावून सुरत येथे गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना नातेवाईकांनी फोन करून घराचे कुलूप तुटले असल्याची माहिती दिली. त्यानंतर ते तातडीने अमळनेरला परतले.

घरात प्रवेश केल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील कपाटांचे कुलूप तोडलेले आढळून आले. कपाटातील सोन्याचे विविध दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. चोरी गेलेल्या ऐवजात बाळाची सोन्याची अंगठी, विविध प्रकारच्या सोन्याच्या पोती, पेंडल, मंगळसूत्राच्या वाट्या, कानातील बाळ्या तसेच ३५ ग्रॅम वजनाचा चपला हार यांचा समावेश असून एकूण किंमत ८.६६ लाख रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.
जिनगर गल्ली हा दाट लोकवस्तीचा भाग असल्याने येथे चोरी होणे अवघड मानले जात असताना ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. 
 खालच्या मजल्यावरील कुलूप अबाधित असल्याने चोरट्यांनी शेजारच्या घरावरून प्रवेश करून चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
 घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, नामदेव बोरकर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी भेट दिली. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. कपाटांवर काही ठसे आढळून आले असून त्यांचे नमुने तपासासाठी घेण्यात आले आहेत.

याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करीत आहेत.

Post a Comment

0 Comments