Header Ads Widget

Responsive Image

अकोला :- आझाद नायक न्युज खंडणीसाठी तेल्हारा येथे व्यापाऱ्याला मारहाण.. जिवे मारण्याची धमकी

अकोला:- आझाद नायक न्युज

 तेल्हारा येथील सोलरचे प्रतिष्ठित व्यापारी विनोद रमेशलालजी बजाज यांना खंडणीसाठी मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचा गंभीर प्रकार घडला आहे. त्यामुळे सदर व्यापाऱ्यासह अनेक व्यापाऱ्यांचा जमाव पोलीस स्टेशन तेल्हारा येथे गोळा झाला असून तशी फिर्याद देण्यात आली आहे. गुन्हेगारीच्या बाबतीत तेल्हारा शहराची वाटचाल बिहार व यूपीच्या दिशेने तर होत नाही ना असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे. कोणताही दोष नसताना कोणीही गुंड प्रवृत्तीची व्यक्ती व्यापाऱ्यांना येऊन मारहाण करत असेल तर कायदा व सुव्यवस्थेसाठी ही चिंताजनक बाब आहे..
 
अनेक व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत विनोद बजाज यांनी तेल्हारा ठाणेदारांकडे फिर्याद देऊन आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आरोपीवर कठोर कारवाई न झाल्यास व्यावसायिकांतर्फे तेल्हारा बंदची हाक देण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे. तेल्हाराचे नवीन ठाणेदार हे प्रकरण कशा प्रकारे हाताळतात व पीडित व्यक्तीला न्याय मिळवून देतात का याकडे व्यापारी बांधवांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments