Header Ads Widget

Responsive Image

जळोद-गांधली पाईपलाईन फुटली; अमळनेरचा पाणीपुरवठा विस्कळीत

अमळनेर :- आझाद नायक न्युज विकी भावसार,पंकज भावसार युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू; नागरिकांना संयम व सहकार्याचे आवाहन

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर शहराला पाणीपुरवठा करणारी जळोद-गांधली मुख्य जलवाहिनी अचानक फुटल्याने आज संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या अनपेक्षित बिघाडामुळे शहरातील हजारो नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असून, नगर परिषद प्रशासनाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य पाईपलाईनमध्ये मोठ्या प्रमाणात गळती निर्माण झाल्याने पाणी पुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. 
घटनास्थळी तांत्रिक पथके दाखल झाली असून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. परिस्थितीवर नगर परिषद प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे.

नगर परिषदेकडून नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होताच नियमित पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या गैरसोयीबद्दल नागरिकांची माफी मागत नगर परिषदेने संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments