आझाद नायक न्यूज: विशेष गौरव
अकोला / अमळनेर:- मुकेश भावसार, पंकज भावसार
जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर नंदीपेठ (अकोट) येथील लेकीने यशाचे शिखर सर केले आहे. श्री. नारायणराव कालुराम जादुबंशीवाले (भावसार) यांची सुपुत्री कु. काजल नारायणराव जादुबंशीवाले (भावसार ) यांची रेल्वे लोहमार्ग पोलीस (Railway Police) पदावर निवड झाली असून, त्यांच्या या यशाने संपूर्ण भावसार समाजात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण पसरले आहे.
कु. काजल यांनी प्रतिकूल परिस्थिती वर मात करत मिळवलेले हे यश केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजातील तरुण-तरुणीं साठी प्रेरणादायी ठरले आहे.
एका सामान्य कुटुंबातून पोलीस दलासारख्या आव्हानात्मक क्षेत्रात भरारी घेतल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या दैदीप्यमान यशाबद्दल आझाद नायक न्यूज (अकोला व अमळनेर) अकोला भावसार समाज तसेच अमळनेर भावसार समाज यांच्या वतीने कु. काजल यांचा गौरव करण्यात आला.
काजलने मिळवलेले हे यश तिच्या परिश्रमाचे फळ आहे. समाजातील मुलींनी अशाच प्रकारे विविध क्षेत्रात आपला ठसा उमटावा, हीच आमची सदिच्छा."
मुकेश भावसार (विक्की) & पंकज भावसार
या निवडीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी आणि देशसेवेसाठी आझाद नायक न्यूज परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा!
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क:
साप्ताहिक आझाद नायक
मुख्य संपादक: -मुकेश भावसार (विक्की)
कार्यकारी संपादक: पंकज भावसार
0 Comments