अकोला:- आझाद नायक न्युज
मुकेश भावसार
कामगार दिनाचे औचित्य साधून सुमिरमा फाउंडेशन तर्फे स्थानिक किराणा मार्केटमध्ये कष्टकरी मजुरांसाठी भव्य मोफत औषधी वाटप व आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
डॉ. पूजाताई खेतान यांचा पुढाकार:
या शिबिराचे आयोजन सुमिरमा फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. पूजाताई रमाकांतजी खेतान व त्यांच्या संपूर्ण टीमने केले होते. कामाच्या व्यापात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मजूर वर्गाला जागेवरच वैद्यकीय सल्ला आणि औषधे उपलब्ध करून देणे हा यामागचा मुख्य उद्देश होता.
प्रमुख उपस्थिती:-
या कार्यक्रमाला किराणा मार्केटमधील मान्यवर पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून शिबिराला प्रोत्साहन दिले.
रमाकांतजी खेतान (अध्यक्ष, होलसेल किराणा मार्केट संस्था)
ज्ञानप्रकाशजी खंडेलवाल (उपाध्यक्ष, किराणा मार्केट संस्था)
कासमअली सेठ डोडिया (सचिव)
राजकुमारजी राजपाल (सहसचिव)
चंचलजी भाटी (कोषाध्यक्ष)
प्रकाश भाई जैन (अध्यक्ष, दलाल असोसिएशन)
तुषार भाई भीमजीयानी (उपाध्यक्ष, दलाल असोसिएशन)
चंद्रकांत महाजन (सहसचिव)
प्रदीपभाऊ देशमुख (कोषाध्यक्ष)
तसेच व्यापारी बंधू प्रदीप कुमार खंडेलवाल, धर्मेंद्रभाऊ जुनगडे, कामगार अध्यक्ष अतीक लीडर आणि मोठ्या संख्येने व्यापारी, दलाल व मजूर बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानप्रकाशजी खंडेलवाल यांनी केले.
किराणा मार्केट परिसरातील सर्व मजूर वर्गांनी या शिबिराचा लाभ घेतला. सुमिरमा फाउंडेशनच्या या उपक्रमाचे व्यापारी संकुलात सर्वत्र कौतुक होत आहे.
आझाद नायक न्यूज — जनसामान्यांचा आवाज!
0 Comments