जळगाव:- आझाद नायक न्युज
प्रेमापोटी कायदेशीर प्रक्रिया झुगारून भारतात प्रवेश करणाऱ्या एका २० वर्षीय बांगलादेशी तरुणीचा प्रकार जळगावात उघडकीस आला आहे.
या प्रकरणी शनी पेठ पोलिसांनी धाड टाकून संबंधित तरुणी आणि तिला साथ देणाऱ्या स्थानिक तरुणाला अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
कोनिका राणी शामलचंद्र राय (वय २०, रा. बांगलादेश) असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे.
जळगाव येथील चिन्मय जगन्नाथ बाला (वय २४) याच्याशी असलेल्या प्रेम संबंधातून तिने बेकायदेशीररित्या भारतीय सीमा ओलांडून जळगावात येऊन राहण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही वैध पासपोर्ट किंवा व्हिसाशिवाय ती भारतात दाखल झाली होती.
पोलिसांची कारवाई:
गुप्त माहितीच्या आधारे शनी पेठ पोलिसांनी परिसरात छापा टाकला असता, ही तरुणी कोणतीही अधिकृत कागदपत्रे सादर करू शकली नाही. यामुळे पोलिसांनी कोनिका राय आणि तिला आश्रय देणारा चिन्मय बाला या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
परकीय नागरिक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, पोलीस आता या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.
0 Comments