Header Ads Widget

Responsive Image

अकोला: प्रशासकीय दिरंगाईचा फटका; अंगणवाडी सेविकांचे मानधन रखडले, आर्थिक संकटात कुटुंब!....

आझाद नायक न्यूज (विशेष प्रतिनिधी):- मुकेश भावसार

 राज्यातील कुपोषण निर्मूलन आणि बालकांच्या प्राथमिक शिक्षणाची धुरा सांभाळणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस सध्या स्वतःच 'आर्थिक कुपोषणा'चा सामना करत आहेत. अकोला जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून मानधन वेळेवर मिळत नसल्याने या महिला कर्मचाऱ्यांचे जगणे कठीण झाले असून, प्रशासनाच्या उदासीनते बद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
​महागाईच्या काळात मानधनासाठी प्रतीक्षा
​अल्प मानधनावर रात्रंदिवस काम करणाऱ्या या सेविकांना घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि औषधोपचार करण्यासाठी दरमहा मानधनाची प्रतीक्षा करावी लागते. 
 परंतु, नियमित मानधन मिळत नसल्याने अनेकींवर उसने-पासणे घेण्याची किंवा कर्ज काढण्याची वेळ आली आहे. "आम्ही प्रामाणिक पणे सेवा देतो, मग आमचे मानधन का रोखले जाते?" असा आर्त सवाल आता अंगणवाडी सेविका विचारत आहेत.
​आर्थिक हाल आणि कौटुंबिक समस्या
​ग्रामीण आणि शहरी भागात तळागाळात काम करणाऱ्या या महिलांना मिळणारे मानधन आधीच तुटपुंजे आहे. त्यातच होणारी ही अनियमितता त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे. घरभाडे, किराणा आणि वीजबिल भरण्यासाठी सुद्धा पैसा नसल्याने अनेक कुटुंबांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

​प्रशासनाकडून केवळ आश्वासने?
 अनेकवेळा आंदोलने आणि निवेदने देऊनही तांत्रिक कारणांचे नाव पुढे करून मानधन लांबणीवर टाकले जात असल्याचा आरोप  केला आहे. जर लवकरच मानधन खात्यात जमा झाले नाही, तर आझाद नायक न्यूजच्या माध्यमातून या अन्यायाला वाचा फोडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

Post a Comment

0 Comments