मुकेश भावसार
अकोला येथील शाळेचा प्रताप शाळेची राहिलेली फी भरल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून ठेवले वंचित....
सध्या प्रत्येक वर्गाची फायनल परीक्षा सुरु असुन काही पालकांनी विध्यार्थ्यांची थोडी फी भरली व राहिलेली उर्वरित फी ही नंतर देऊ असे सांगितल्या नंतर देखील
अकोला येथील बाळापूर नाका, भिरड वाडी येथील,संताजी कॉन्व्हेंटच्या शिक्षकांनी व सदरील संस्थेच्या अध्यक्ष यांनी 30 ते 40 विद्यार्थी यांना तोंडी परीक्षा न घेता वर्गाबाहेर 3 तास बसवून ठेवले.
यावर पालक जाब विचारायला गेले असता अध्यक्ष यांनी त्यांच्याशी हुज्जत घालून तुम्हांला जिथे जाऊन कम्प्लेंट करायची करा आमचे काही होतं नाही असे सांगत अपमानित केले.
तरी सदर संस्थेवर व शाळेवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी व विद्यार्थ्यांना परीक्षेपासुन वंचित ठेऊ नये असा पालकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
0 Comments