नागपुर/अकोला :- आझाद नायक न्युज
दि. २३.०३.२०२६
देशाला गुलामीकडे घेऊन जाण्याचा डाव मोदींनी आखला आहे की काय अशी शंका यावी अशी निर्णय प्रक्रियेतून देशात राबवली जात आहे.
अमेरिका म्हणेल त्याच देशाकडून खरेदी करायची अमेरिका म्हणेल त्याच देशाकडून खरेदी नाही करायची. अमेरिका म्हणेल ते निर्णय देशात घेतले जात आहे. अमेरिका धर्जिण धोरणे आखली जात आहे. त्यामुळे भारत देशाचे सार्वभौमत्व मोदींनी अमेरिकेकडे गहाण ठेवले आहे की काय अशी शंका येत आहे.
या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड सुभाष लांडे करणार आहेत. नागपूर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड युगल रॉयलु, अकोला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड नयन गायकवाड यांचा एपस्टीन फाइल्स वाद प्रकरणात भाजप नेत्यांची नावे आल्याचा आरोप करत हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे भारताची प्रतिमा आणि स्वाभिमान धोक्यात आला आहे. त्यामुळे या विषयावर संघाकडून स्पष्टीकरण मिळावे, अशी मागणी करण्यात येणार आहे.
या मोर्चात हजारो कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता असून, सध्या पोलिस परवानगीची प्रक्रिया सुरू आहे.
एपस्टीन फाईल बाहेर आल्यामुळे याचा दबाव मोदींवर असावा असे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा आणि देशाला पारतंत्र्यापासून रोखावे यासाठी आज २३ मार्च रोजी संविधान चौक येथुन नागपूर आरएसएस मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या आंदोलनात काँग्रेस भारतीय कम्युनिस्ट पक्ष व पक्षाचे जनसमुदाय जमलेले अकोल्यातून कॉम्रेड नयन गायकवाड, कॉम्रेड मायावती बोरकर, कॉम्रेड चित्रा दांडगे, कॉम्रेड सविता प्रधान, कॉम्रेड अनिता खैरनार, कॉम्रेड सुमित्रा वानखडे, कॉम्रेड सुवर्णा घोडेस्वार, कॉम्रेड वैशाली शर्मा, कॉम्रेड प्रशांत कडु यांच्या सह मोठ्या संख्येने जनतेने सामील व्हावे.
0 Comments