या निर्णयामुळे अनेक वर्षे काम करूनही केवळ वयामुळे पदोन्नती पासून दूर राहिलेल्या हजारो सेविकांना आता संधी मिळणार आहे.
महिला व बालविकास विभागाने 2021 मध्ये काढलेल्या नियमां नुसार, 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अंगणवाडी सेविकांना पर्यवेक्षिका पदासाठी पात्र मानले जात नव्हते. या नियमामुळे अनेक अनुभवी सेविकांमध्ये नाराजी होती. याबाबत काही सेविकांनी न्यायालयात धाव घेतली होती.
अंगणवाडी सेविका 65 वर्षांपर्यंत काम करू शकतात, मग 45 वर्षांनंतर त्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवणे योग्य नाही. केवळ वयाच्या आधारावर एखाद्याची क्षमता ठरवता येत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
सरकारने न्यायालयात असा दावा केला की, जास्त वयात पदोन्नती मिळाल्यास सेवाकाल कमी उरतो. मात्र, न्यायालयाने हा मुद्दा मान्य केला नाही. हा नियम समानतेच्या अधिकारा विरोधात असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
संघटनानी केला आनंद साजरा
या निर्णयानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आनंद व्यक्त केला असून, आभारही व्यक्त केले आहे. सरकारने लवकरात लवकर पदोन्नती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी केली आहे.
0 Comments