Header Ads Widget

Responsive Image

अखेर सत्याचा विजय..अंगणवाडी सेविकेचे निलंबन अखेर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी रोखले

मुलांना पोषण आहारात निकृष्ट दर्जाचा आहार मिळत असल्याची तक्रार केल्यानंकर बडतर्फ करण्यात आलेल्या अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  देवयानी पारधी यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली आहे.
 पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विरधवल जगदाळे यांनी जिल्हा महिला बाल कल्याण अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत. देवयानी पारधी यांना तात्काळ सेवेत सामील करुन घेण्यास सांगण्यात आलं आहे.

 निकृष्ट पोषण आहाराचा व्हिडीओ पोस्ट केल्याने देवयानी पारधी यांच्यावर तालुका महिला बालकल्याण अधिकारी यांनी रिपोर्ट पाठवला आणि जिल्हा महिला बालकल्याण अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. मात्र यावर उत्तर मागवून, वेळ देत स्पष्टीकरण मागवणं अपेक्षित होतं. कारवाई करताना प्रक्रियेचं पालन झालेलं नाही. आम्ही यासंदर्भात महिला बालकल्याण अधिकाऱ्यांना सूचना केली आहे. तसंच मुख्य अधिकारी यांच्याशी चर्चा करुन कारवाई मागे घेत पुन्हा सेवेत घेण्याचा आदेश दिला आहे.
   अशी माहिती पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी दिली आहे.
पुण्याच्या आंबेगावातील अंगणवाडी सेविका देवयाना पारधी यांनी मुलांना पोषण आहारात निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली होता.
 मुलांना निकृष्ट दर्जाचा आहार मिळत असल्याने त्यांचं पोट दुखत असून, कुपोषण वाढत असल्याची तक्रार त्यांनी इंस्टाग्राम व्हिडीओच्या माध्यमातून केली होती. वाटाणा, भरडा कित्येक वेळ शिजत नसल्याचं सांगत त्यांनी याकडे लक्ष वेधलं होतं. मात्र अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली.
  मुलांसाठी भरडा, साखर, मूगडळा, हळद, मीठ, मिरची असा कच्चा माल येत असतो. यामध्ये येणारा पांढरा वाटाणा तो शिजला आहे की कच्चा कळत नाही. ९ ते १० शिट्ट्यानंतरही वाटाणा शिजत नाही. थोडा थंड झाला की कच्चा होता. यामुळे मुलांची पोटं दुखतात. असा आहार मुलांना खाऊ घालायचा का? मुलं हा वाटाणा खायला नको म्हणतात. भरडा पाच ते सहा शिट्ट्यांनंतरही तसाच आहे. तो शिजला जात नाही, मग कितीही तेल टाका. तुम्ही तुमच्या मुलांना असा खाऊ घालाल का? पण आम्ही नाईलाजाने खाऊ घालत आहोत. माझ्या मनाला हे फार खटकत होतं".

  माझी शासनाला विनंती आहे की, आम्हाला जो फेडरेशनचा आहार देत आहात तो थोडा द्या, पण चांगल्या दर्जाचा द्या. असा निकृष्ट दर्जाचा माल आमच्या मुलांना देऊ नका. या निकृष्ट दर्जाच्या आहारामुळे मुलांचं वजन वाढण्याऐवजी कमी होतं. त्यामुळे कुपोषण वाढतं. आम्ही मुलांना आमच्या मुलांसारखं जपत असताना न शिजणारा वाटाणा, लापसी देत आहात. 1 किलो लापशीला पावशेर साखर लागत असेल त ती गोड होईल का? मुलंही खात नाहीत," अशी व्यथा त्यांनी मांडली होती.
  तुकाराम मुंढे यांनाही माझी विनंती आहे. अन्न भेसळ होत आहे तिथे तुम्ही छापे टाकत आहात ही चांगली बाब आहे. पण आमच्या अंगणवाड्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या आहारावरही निर्बंध घाला. आमच्या मुलांना हा आहार नको आहे. मुलं चांगलं खायला मिळेल या आशेने अंगणवाडीत येतात. आहाराच्या बाबतीत तरी मुलांशी असं करु नका," अशी विनंती त्यांनी अखेरीस केली.
  पोषण आहार म्यानेज करायचे देखील घेतात पैसे 
  काही अंगणवाडी मध्ये पोषण आहार म्यानेज करण्याचे देखील पैसे घेतले जात असल्याचा आरोप अधिकारी वर्गावर करण्यात आला आहे.
   तर काही गरम आहार पुरविणारे गट,संस्था हे आपली मनमानी करतांना दिसुन येत आहे.
  प्रत्येक लाभार्थी आहार हा मोजून ठरवलेला असुन बरेचश्या अंगणवाडी मध्ये ठरलेल्या मेनु नुसार आहार वाटप होत नाही गुळ शेंगदाणेच्या लाडू ऐवजी राजगिरा लाडू देण्यात येतो.गव्हाची लापशी तर देतच नाही.असे लाभार्थी मधुन नाराजीचा सूर उमटत आहे.

Post a Comment

0 Comments