Header Ads Widget

Responsive Image

आझाद नायक न्यूज अमळनेर:-- पंकज नरेंद्र भावसार मुख्य कार्यकारी संपादक – अमळनेर भावसार क्षत्रिय समाज व पारितोषिक दाते मार्फत बक्षिस वितरण व गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

आझाद नायक न्यूज अमळनेर:-- पंकज नरेंद्र भावसार मुख्य कार्यकारी संपादक – 
 अमळनेर भावसार क्षत्रिय समाज व पारितोषिक दाते मार्फत बक्षिस वितरण व गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न...

अमळनेर भावसार क्षत्रिय समाजाच्या वतिने रविवार, दि. १६/०८/२०२६ रोजी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिस व गुणगौरव सोहळा श्री. संत सखाराम महाराज भक्त निवास, वाडी चौक येथे मोठ्या उत्साहात पार पडला. 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सुरेश सिताराम शेठ भावसार, जव्हार हे होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस समाजाचे अध्यक्ष श्री. परेश शांतीलाल भावसार यांनी प्रास्ताविक केले. तसेच प्रमुख पाहूणे म्हणून श्री प्रा. डॉ. प्रभाकर जोशी सर, ज्येष्ठ समाज बांधव श्री भावलाल पोपट भावसार श्री सुभाष यशवंत भावसार श्री प्रकाश फकीरा भावसार श्री मनोहर गुरुदास भावसार तसेच पारितोषिक दाते श्री. राजेश रघुनाथ करंजे, सौ प्रतिभा कृष्णकांत भावसार यांचे शाल, श्रीफळ, सन्मान पत्र देऊन स्वागत करण्यात आले.
त्याचप्रमाणे गुणगौरव समारंभाला  आपले ज्येष्ठ समाज बांधव श्री. अॅड. चंद्रकांत गोकुळदासशेठ भावसार  यांनी रू. ११.१११/- ,श्री सुभाष यशवंत सारजे यांनी रू. ११११/- श्री प्रकाश फकीरा भावसार यांनी २००/- रुपये शिक्षण फंडास उदार अंतकरणाने देणगी जाहिर करून समाजाला व पर्यायाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. त्यांचे कार्यकारी मंडळातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.
याप्रसंगी पारितोषिक दाते  श्रीकृष्णकांत वासुदेव शेठ भावसार त्याचप्रमाणे प्रा. मनीष रघुनाथ करंजे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या वतीने त्यांच्या सुकन्या सौ वंदनाताई भावसार, मुख्याध्यापिका मनमाड यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना समाजातर्फे तसेच पारितोषिक दात्यांमार्फतचे बक्षिसे उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन शिक्षण समिती चेअरमन श्री प्रा. प्रवीणकुमार रणछोडदास भावसार यांनी केले तर आभार श्री. सुरेश नारायण भावसार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष नंदलाल रतिलाल भावसार, सेक्रेटरी-कुंदन गोपीनाथ भावसार सहसेक्रेटरी निलेश गोकुळ भावसार, खजिनदार-रविंद्र प्रभाकर भावसार, कार्यकारी सदस्य शांमकांत मिठाराम भावसार, दीपक तुकाराम भावसार, कृष्णकांत जगन्नाथ भावसार तसेच सागर सुभाष भावसार,निलेश विजय भावसार, लक्ष्मीकांत मणिलाल भावसार, हेमंत भावसार (सेवक),सर्व कार्यकारणी मंडळ,नवयुवक मंडळ यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments