हिवरखेड प्रतिनिधी :- धीरज बजाज
फक्त पाचशे रुपयांच्या लालसेपोटी माणूस किती खालच्या स्तराला जाईल हे सांगणे कठीण आहे. पाचशे रुपयांच्या लालसेपोटी तब्बल 18 एकर शेतीला आग लावून दिल्याची धक्कादायक घटना घडल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात असून समाजमन सुन्न झाले आहे तर शेतकरी हवालदिल झाला आहे.
सविस्तर असे की, हिवरखेड येथील प्रयोगशील शेतकरी मुकुंद पुरुषोत्तम अग्रवाल उर्फ पंकज अग्रवाल यांची व त्यांच्या कुटुंबीयांची हिवरखेड नजीकच्या चिचारी शेत शिवारात चंदनपुर गावालगत गट नंबर 19/ब,19 क 19/ड मध्ये एकूण 18 एकर शेती असून त्या शेतात संत्रा सिताफळ बाग असून इतर सर्वच प्रकारची झाडे आहेत. शेताचे धु-यावर बांबुची झाडे लावलेली आहेत.
दि. 21/05/2026 गुरुवार रोजी दुपारी त्यांचे मित्र शेर खा नूर खा यांनी फोन करून सांगीतले की, "तुमच्या चिचारी शेतातील बांबूला व पिंकाना एका व्यक्तीने माचिसने आग लावली आहे. आणि मी त्याच्याकडे धावत गेलो असता तो मला पाहून नवी तलई कडे पळून गेला. असे सांगीतले.
मुकुंद अग्रवाल यांनी लगेच शेतात जावून पाहीले असता तेथे मोठी आग लागलेली दिसली. त्या आगीमूळे शेतातील संत्राची शेकडो झाडे, सिताफळाची शेकडो झाडे, शेताचे धुऱ्यावर असलेले अंदाजे 3500 नग बांबु, जनावरांसाठी असलेला गोठा, गोठ्यात असलेली खताचे 30 पोते , शेतात पिंकाना पाणी देण्यासाठी लावलेले ड्रिप नळीचे 30 बंडल, स्पिंकलरचे 45 पाईप, स्प्रिंकलरचे 18 पितळी नोजल, चंदनाची 10 झाडे, सागवान 10 झाडे, निलगिरिची 03 झाडे, मिया जॉकी उच्च प्रजातीची आंब्याची 60 ते 70 झाडे, कुंपण आणि झटका मशीन असा अंदाजे दहा लक्ष रुपयाच्या वर मुद्देमाल जळून खाक झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही प्राणहानी झाली नाही.
पत्रकार सुरज चौबे यांनी तात्काळ घटनेची माहिती हिवरखेड पोलिसांना दिली असता हिवरखेड पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. व आरोपी रमेश मंगल कासदेकर रा. नवी तलई ता. तेल्हारा, जि. अकोला याला ताब्यात घेण्यात आले.
त्याला पोलिसांनी विचारणा केली असता त्याने एका व्यक्तीने 500 रुपये देऊन आग लावण्यास सांगितले असता मी 500 रुपयांच्या लालसे पोटी शेताला आग लावली. आणि आग लावल्या नंतर त्या पैशाने दारू पिलो असा खुलासा केला. पैसे देणाऱ्या व्यक्तीचे नाव माहीत नसून मी त्याला चेहऱ्याने ओळखतो असे सुद्धा आरोपी रमेश मंगल कासदेकर याने बोलताना सांगितले.
मुकुंद अग्रवाल यांच्या फिर्यादी वरून हिवरखेड पोलिसांनी आरोपी रमेश कासदेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला पैसे देऊन आग लावण्यास प्रवृत्त करणाऱ्याचा सुद्धा शोध घेतल्या जात आहे. ठाणेदार गजानन राठोड यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पोलीस ताफा पाठविला आणि विनोद खर्डे मेजर, हेड कॉन्स्टेबल आकाश गजभार इत्यादी नी आरोपीला तात्काळ अटक करून भारतीय न्याय संहिता कलम 326 फ नुसार गुन्हा दाखल केला.
महावितरणचे आणि नागरिकांचे सहकार्य कामी पडले.
भीषण आग लागल्यानंतर पंकज अग्रवाल, शेर खान नूर खान, अब्दुल कलाम अब्दुल सलाम, रामधन अग्रवाल, सुरज चौबे,धिरज बजाज, गणेश पानेरकर, सुरेश मोरे, तसेच चिचारी आणि चंदनपुर येथील ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी धाव घेतली आणि मोठा अनर्थ टाळला तसेच प्रसंगावधान राखून तात्काळ जेसीबी बोलावून आगीच्या दोन्ही बाजू पलीकडील पाला पाचोळा आणि इतर साहित्य बाजूला केल्याने आगीची झळ चंदनपुर आणि चिचारी गावापर्यंत पोहोचली नाही. कारण त्यांच्या शेताच्या दोन्ही बाजूला चिचारी व चंदनपुर अशी गावे आहेत आग वेळीच आटोक्यात आली नसती तर या दोन्ही गावांना आगीने झळ पोहोचली असती. आणि मोठा अनर्थ घडला असता.
या प्रकरणात महावितरणची सहकार्याची भूमिका निर्णायक ठरली आग लागल्याच्या वेळेस सदर क्षेत्रात भार नियमनाची वेळ होती. परंतु आग वेळीच विझविली नाही तर
चिचारी व चंदनपुर ह्या गावांना धोका होऊ शकतो हि बाब सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यां च्या निदर्शनास आणून दिली असता कार्यकारी अभियंता संजय कुटे अकोट, सहाय्यक अभियंता आशिष धांडे हिवरखेड, लाईनमन उमेश जावकार, ऑपरेटर सुदाम भगत, सागर काळे आणि महावितरणच्या संपूर्ण स्टाफ ने सहकार्य करीत दोन वेळेस विद्युत पुरवठा सुरू केल्याने आग विझविण्यात यश आले.
दुसऱ्या दिवशी महसूल व कृषी विभागाचा पंचनामा.
मंडळ अधिकारी झापे व तलाठी गायकी यांना माहिती दिल्यानंतर आग लागल्याच्या दुसऱ्या दिवशी कृषी विभाग व महसूल विभागाने संयुक्त पंचनामा करून शेतकऱ्याला तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. यावेळी तलाठी किशोर गायकी, कृषी विभागाचे पेठे इत्यादींनी भेट दिली.
0 Comments