अमळनेर :- आझाद नायक न्युज
विकी भावसार,पंकज भावसार
ॲड. सारांश सोनार यांची कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती; सर्व स्तरावरील प्रकरणांमध्ये मांडणार भक्कम बाजू
अमळनेर नगरपरिषदेच्या कायदेशीर सल्लागारपदी तरुण, अभ्यासू आणि तडफदार विधीज्ञ ॲड.सारांश सोनार यांची नियुक्ती करण्यात आल्याने शहरात समाधानाची लाट पसरली आहे.
नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या ठरावानुसार मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी नुकतेच त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान केले.
ॲड. सोनार हे सध्या मुंबई उच्च न्यायालय तसेच अमळनेर येथील न्यायालयात सक्रियपणे वकिली व्यवसाय करत आहेत. याआधीही त्यांनी अर्बन बँकेचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहिले असून, त्यांचा अनुभव आता नगरपरिषदेच्या कामी येणार आहे.
जेष्ठ पत्रकार धनंजय सोनार यांचे ते चिरंजीव आहेत,वडिलांप्रमाणेच परखड व सत्येची बाजू मांडणारे व पीडितेला न्याय देणारे म्हणुन त्यांची लहान वयात ख्याती आहे.
त्यांनी भरपुर जिल्ह्यात वादविवाद स्पर्धेमध्ये मेडल,गोल्ड मेडल देखील मिळविले आहेत.
नगरपरिषदेच्या वतीने ते —दिवाणी प्रकरण,फौजदारी प्रकरण,जिल्हा सत्र न्यायालय वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय या सर्व ठिकाणी परिषदेची बाजू प्रभावीपणे मांडणार आहेत.
मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव!
या नियुक्तीबद्दल राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा
माजी आमदार शिरीषदादा चौधरी, डॉ.डिगंबर महाले,अँड एस.आर. पाटील,ॲड.रमाकांत माळी, डॉ.परीक्षित बाविस्कर, प्रा. अशोक पवार, गौतम मोरे, डॉ. अविनाश जोशी आणि काँग्रेस नेते संदीप घोरपडे यांचा समावेश आहे.
नव्या जबाबदारीसह मोठ्या अपेक्षा!
तरुण व अभ्यासू वकिलाच्या रूपात ॲड. सारांश सोनार यांच्याकडून नगरपरिषदेच्या कायदेशीर काम काजात अधिक वेग, पारदर्शकता आणि मजबुती येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0 Comments