Header Ads Widget

Responsive Image

मेघा इंजिनियरिंग कंपनीच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध

अकोला :- आझाद नायक न्युज, 
मुकेश भावसार 

लक्ष्मीकांत कौठकर यांनी दिले तीव्र आंदोलनाची चेतावणी
जिल्हाधिकारी यांना निवेदन

अकोला:मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी जिल्ह्यात जागोजागी होत आहे. जरी योजनेला नाव मुख्यमंत्री यांचे आहे परंतु मेघा इंजिनियरिंग खासगी कंपनी आहे. या कंपनीला अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभलेले आहे. परंतु शेतशिवार आडगाव बु गट क्र. 245 मध्ये होणाऱ्या सौर प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्याचा विरोध आहे.ही जमीन इ क्लास ची असल्याने कमी किंमतीत मेघा इंजिनियरिंग ला देण्यात आली.या भागात पाण्याची पातळी खूप खाली गेली असून कोरडा भाग आहे.या भागातील पाण्याची पातळी वाढावी म्हणून जलसंधारण अंतर्गत तीन मोठ्या तलावाची निर्मिती केली होती. यावर बराच शासकीय संपत्ती खर्च झाली. शेतकऱ्यांना याचा उपयोग झाला. तीन नाल्याचे पाणी यात येत होते.
मेघा इंजिनियरिंग च्या कर्मचाऱ्यांनी भूखंड ताब्यात येताच या तलावातील पाणी बंद केले. एक तलाव पूर्ण भुजला तर उर्वरित दोन तलावाच्या भिंती खासवून त्यावर सौर प्यानल उभारण्यात येत असून तलाव भुजवत आहेत. याकडे शासकीय अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत."पाणी अडवा पाणी जिरवा" असे शासनाचे उद्देश असून तलावांची निर्मिती वर सरकार चा भर आहे. वेगवेगळ्या सेवाभावी संस्था यावर काम करीत आहेत.कंपनी या विरुद्ध काम करीत आहे.
  या भूखंडातून शेतकऱ्यांचे वाहवटीचे रस्ते आहेत. या रस्त्यात नाल्याचे पाणी लावून देण्यात आले आहे. एकीकडे सरकार पांदण रस्त्यावर भर देत आहे तर दुसरीकडे मेघा इंजिनियरिंग या विरुद्ध काम करीत आहे.या भूखंड वर सामाजिक वनीकरण च्या अंतर्गत तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली होती. ही सर्व झाडे प्रकल्प बनवतांना तोडण्यात आलेली आहे.हे सुद्धा नियम बाह्य आहे.एकीकडे माननीय मुख्यमंत्री 300 कोटी झाडं लागवड ची घोषणा करीत आहेत या विरुद्ध मेघा इंजिनियरिंग ने वृक्ष तोड केली.म्हणून शेतकऱ्यांचे वाहवटीचे शेतरस्ते मोकळे व वेवस्थित करून घ्यावे,पाण्याचे तलाव पूर्व व्रत करून घ्यावे,झालेल्या नुकसानभरपाई ही मेघा इंजिनियरिंग कडून घेण्यात यावी असं न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांनी दिलेला आहे. 
  यावेळी,सौ. वर्षा नागेश नेमाडे,सौ. ललिता राजू सिरसागर,सौ, मीना गजानन निमकर्डे,सौ. वर्षा गजानन नेमाडे,सौ. किरण कौठकर निलेश नेमाडे, मोहन खिरोडकार,जबिर खा, नारायण आसरे,शेख इरफान,गजानन भड, राजू सिरसागर,सागर खिरोडकार,गजानन निमकर्डे, वासुदेवराव खिरोडकार, मनोज नेमाडे,यादी उपस्थित होते.

कोड:संपूर्ण शासनाच्या धोरणा विरोधी काम या मेघा इंजिनियरिंग ने केलेले आहे. हे सर्व कामाची परवानगी या कंपनी ला कशी मिळाली याची चौकशी करण्यात यावी. झालेल्या सरकारी योजनांचे नुकसानाची भरपाई मेघा इंजिनियरिंग कडून वसूल करण्यात यावी. जोवर पूर्ण चौकशी होत नाही तोवर या सौर प्रकल्पाचे काम थांबवून तूर्तास स्थिगीत द्यावी. वेळोवेळी निवेदन देऊन प्रशासन दुर्लक्ष करीत असेल व शेतकऱ्यांच्या मूलभूत अधिकारावर अतिक्रमण करीत असेल हे सहन केल्या जाणार नाही. याला प्रतिउत्तर म्हणून शेतकरी संघटना(रघुनाथ पाटील प्रणित) "करो वा मरो"आंदोलन करणार!
लक्ष्मीकांत कौठकर
विदर्भ अध्यक्ष,शेतकरी संघटना (रघुनाथ पाटील प्रणित)

Post a Comment

0 Comments