Header Ads Widget

Responsive Image

अमळनेर शहराचे माजी आमदार शिरीष दादा चौधरी व माननीय लोकनियुक्त नगराध्यक्ष परिक्षित बाविस्कर यांनी यात्रेनिमित्त केली नदी पात्राची पाहणी...

 श्री सदगुरु सखाराम महाराज यात्रा उत्सवासाठी प्रशासन सज्ज! नियोजन, सुरक्षा आणि स्वच्छतेवर विशेष भर

अमळनेर | प्रतिनिधी
श्री सद्गुरु सखाराम महाराज यात्रा उत्सवानिमित्त यंदा प्रशासनाने सर्वंकष आणि काटेकोर नियोजन केल्याचे स्पष्ट झाले आहे. यात्रेदरम्यान भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, तसेच सुरक्षित आणि सुव्यवस्थित वातावरणात उत्सव पार पडावा यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार गिरीश दादा चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षीत बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत दादा निकम, मुख्याधिकारी गणेश शिंदे तसेच सर्व नगरसेवक व संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.

 सुरक्षेसाठी कडक उपाययोजना
यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे. संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष ठेवून सीसीटीव्ही कॅमेरे व नियंत्रण पथके तैनात करण्यात येणार आहेत.
 ग्रामीण भागातून येणाऱ्या भाविकां साठी सोयी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, तात्पुरती निवास व्यवस्था आणि वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात येणार आहे.


नदीपात्रात विशेष नियोजन
यात्रेचा मुख्य केंद्रबिंदू असलेल्या नदीपात्र परिसरात सुरक्षित मार्ग, बॅरिकेडिंग आणि गर्दी नियंत्रणासाठी विशेष पथके तैनातकेली जाणार आहेत. अपघात टाळण्यासाठी सतत देखरेख ठेवली जाणार आहे.

स्वच्छतेवर भर – ‘स्वच्छ यात्रा, सुरक्षित यात्रा’
नगरपरिषदेमार्फत स्वच्छतेसाठी विशेष पथके, कचरा संकलन व्यवस्था आणि नियमित साफसफाई करण्यात येणार आहे. 
नागरिकांनीही स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे

नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता
यात्रेदरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग, दिशादर्शक फलक आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
प्रशासनाचा निर्धार
यात्रा उत्सव शांततेतसुरक्षिततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे,असे उपस्थित मान्यवरांनी स्पष्ट केले.
*यात्रेसाठी करण्यात आलेल्या या भक्कम नियोजनामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण असून,यंदाचा उत्सव अधिक सुव्यवस्थित आणि यशस्वी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments