Header Ads Widget

Responsive Image

अमळनेर :-आझाद नायक न्युज विकी (मुकेश )भावसार अमळनेरमध्ये चोरीच्या घटना डोके वर काढू लागल्या...गस्त वाढवण्याची मागणी

अमळनेर शहरात धाडसी चोरी – ६४ हजारांचा ऐवज लंपास
 
  कुटुंब पुण्याला गेल्याचा घेतला फायदा... सर्व घटना CCTV त कैद 
  
अमळनेर शहरातील ढेकू रोडवरील जय योगेश्वर कॉलनीत घडलेल्या घरफोडीच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण तब्बल ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला .
   मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली चंद्रकांत वाघ,वय ४८वर्ष या १४ मार्चपासून आपल्या कुटुंबासह पुणे येथे गेल्या होत्या . घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी ३ एप्रिलच्या पहाटे अडीच ते तीनच्या दरम्यान घराचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला.

सीसीटीव्हीत कैद गुन्हेगार
घरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार चोरटे स्पष्टपणे दिसून आले असून एक जण बाहेर पहारा देत असल्याचेही आढळले . इतरांनी घरात शिरून कपाट फोडून सामानाची तोडफोड करून आणि ऐवज लंपास केला.
 सदर चोरी झालेला ऐवज चे वर्णन खालील प्रमाणे सोन्याच्या अंगठ्या अंदाजे ३० हजार रुपये,इतर दागिने अंदाजे १२ हजार रुपये,चांदीचे दागिने अंदाजे १० हजार रुपये,रोख रक्कम अंदाजे १२ हजार रुपये असा
एकूण ६४ हजार रुपयेचा ऐवज चोरट्यानीं लंपास केला आहे
दरम्यान, ४ एप्रिल रोजी मुलाच्या मित्राने घराचे कुलूप तुटले असल्या ची माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला . ५ एप्रिल रोजी कुटुंब परतल्यानंतर चोरीची खात्री झाली.

    याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करत आहेत. 
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास वेगाने सुरू आहे.

 

Post a Comment

0 Comments