Header Ads Widget

Responsive Image

अमळनेर :- आझाद नायक न्युज,आमदार अनिल पाटिलांच्या रस्ता पाहणी नंतर लगेच कामाला वेग.....

अमळनेर:-  विकी भावसार
                   परेश उदेवाल
  “वर्षानुवर्षे रखडलेला ढेकू–मांडळ रस्ता अखेर मार्गी!  आमदारांच्या धडाकेबाज पाहणीनंतर कामाला वेग”

अमळनेर | विशेष "
अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधून जाणारा आणि अनेक गावांना जोडणारा ढेकू–मांडळ हा प्रमुख रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला होता. रस्त्याची दयनीय अवस्था, खड्ड्यांचे साम्राज्य आणि धुळीच्या लोटांमुळे नागरिकांचे हाल अक्षरशः असह्य झाले होते. मात्र, आता या समस्येला अखेर न्याय मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

स्थानिक नागरिकांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर राजूदादा फाफोरेकर आणि योगिता ताई कापडणेकर यांनी हा प्रश्न जोरदारपणे उचलून धरला. त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत आमदार अनिल दादा पाटील यांनी थेट घटनास्थळी धडक देत रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली.

आमदारांच्या या अचानक पाहणीमुळे ठेकेदार आणि संबंधित यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली. कामाच्या गुणवत्तेबाबत कसलीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आमदारांनी देत अधिकाऱ्यांना कडक सूचना केल्या.
 “हा रस्ता केवळ दुरुस्त नाही, तर उत्कृष्ट दर्जातच पूर्ण झाला पाहिजे,” असा सज्जड दम आमदारांनी भरल्याने कामाला तातडीने वेग आला आहे.
अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या या रस्त्याचे काम अखेर सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण आहे. “आता तरी आमच्या त्रासाला पूर्णविराम मिळणार,” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

 या पाहणी दौऱ्यावेळी सन्माननीय नगरसेवक सचिन बळवंत पाटील व मनीलाल पवार, निलेश फाफोरेकर, अशोक पाटील, सोनवणे सर, मनीष भावसार, सरपंच सुनील पवार, नितीन पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकप्रतिनिधींच्या तत्परतेमुळे वर्षानुवर्षे रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागला—आता नागरिकांच्या नजरा कामाच्या दर्जावर!

Post a Comment

0 Comments