अमळनेर:- विकी भावसार,
परेश उदेवाल
एसटी NCMC कार्ड घोटाळा उघड! सवलतीच्या नावाखाली नागरिकांची लूट आणखी 2 एजंटवर कारवाई!
शासनाने ठरवले १९९ रुपये, पण एजंट घेत होते ३०० रुपये!
अमळनेर आणि चोपडा येथे कारवाई मशीन जप्त, फसवणुकीवर लगाम!
एसटी प्रवास सवलतीसाठी आवश्यक असलेल्या एनसीएमसी कार्डच्या नावाखाली सुरू असलेल्या लूटप्रकरणी प्रशासनाने कठोर पाऊले उचलत आणखी दोन एजंटवर कारवाई केली आहे.
नागरिकांकडून जादा शुल्क वसूल करून फसवणूक करणाऱ्या एजंट्सचे मशीन जप्त करण्यात आले आहे .
१२ वर्षांवरील महिला , जेष्ठ नागरिक आणि अमृत जेष्ठ नागरिकांसाठी एसटीने NCMC कार्ड अनिवार्य केले आहे. यासाठी प्रत्येक आगारात तसेच खाजगी एजंट नेमण्यात आले आहेत. शासनाने प्रत्येक कार्डासाठी फक्त १९९ रुपये फी निश्चित केली असताना काही एजंट नागरिकांकडून तब्बल ३०० रुपये वसूल करत असल्याच्या तक्रारी समोर आल्या.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत विभाग नियंत्रक दिलीप बंजारा यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले .
वाहतूक निरीक्षक देशमुख आणि आगार प्रमुख पाटील यांच्या मार्गदर्शना खाली कारवाई करण्यात आली.
अमळनेर येथे माया शिवदे यांना अधिकृत एजन्सी देण्यात आली होती, मात्र त्यांनी जळोद परिसरात जादा दराने नागरिकांची लूट केल्याचे उघड झाले.
तसेच चोपडा बसस्थानकावर कुणाल गायकवाड यानेही नागरिकांकडून अधिक शुल्क घेतल्याचे निदर्शनास आले.
या दोन्ही प्रकरणांत संबंधित एजंट्सचे मशीन जप्त करून कठोर कारवाई करण्यात आली आहे.
प्रशासनाचा इशारा:
नागरिकांनी अधिकृत शुल्कापेक्षा जास्त पैसे देऊ नयेत आणि अशा प्रकारच्या फसवणुकीची तक्रार तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांकडे करावी.
या कारवाईमुळे फसवणूक करणाऱ्यां मध्ये खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे
0 Comments