अमळनेर:-आझाद नायक न्युज,
विकी भावसार, परेश उदेवाल
बस स्टँडसमोरील भागवत रोड अतिक्रमणाच्या विळख्यात – शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळ सुरु...
अमळनेर शहरातील बस स्टँडसमोरील भागवत रोडवर सध्या अतिक्रमणाचा अक्षरशः कहर केलेला पाहायला मिळत आहे. शाळकरी मुला-मुलींचा हा प्रमुख रहदारीचा मार्ग असतानाही येथे डिजिटल होल्डिंग, फळ फ्रुट्स व इतर खाद्यपदार्थची दुकाने, आणि रस्त्यावरच उभे केलेले पारोळा जाणाऱ्या गाड्या, रिक्षा यांच्या अतिक्रमणा मुळे संपूर्ण मार्ग अरुंद झाला आहे.
दररोज शेकडो विद्यार्थी या रस्त्यावरून ये-जा करतात, मात्र अतिक्रमणामुळे त्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. 
रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या कामांमुळे ठिणग्या उडत असताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती पालकां कडून व्यक्त केली जात आहे.
नागरिकांचा संताप उफाळला:
“नगरपालिका प्रशासन दुधावरची साय खाण्यात मग्न आहे, तर अतिक्रमण विभाग प्रमुख लोणी खाण्यात व्यस्त आहे!” अशी तीव्र प्रतिक्रिया संतप्त नागरिकां नी दिली आहे.
शहरातील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत असून सामान्य नागरिकांना रस्त्यावर चालणेही कठीण झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासना कडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
मागणी काय?
बस स्टँडसमोरील भागवत रोडवरील फळ फ्रुटच्या गाड्या तसेच सर्व डिजिटल होल्डिंग फ्लॅक्स,अतिक्रमण तात्काळ हटवून हा परिसर “अतिक्रमणमुक्त क्षेत्र” म्हणून घोषित करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
आता प्रश्न एकच – प्रशासन जागे होणार की एखाद्या निष्पाप विद्यार्थ्या च्या जीवाची किंमत मोजावी लागणार नगरपालिका प्रशासन दुधावरचे मलाई खाण्यात मग्न व अतिक्रमण विभाग प्रमुख लोणीच्या स्वाद घेण्यात मग्न आहेत.व एका जागेवर ठाण मांडून उंटावर बसून शेळ्या हाकण्याचं काम करत आहेत.
0 Comments