अमळनेर :- विकी भावसार, परेश उदेवाल
“आझाद नायक न्यूजचा धडाका; प्रशासन अखेर जागे!”
अमळनेर : राजाराम नगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना दूषित पाणी व गटारीच्या गाळाच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. मात्र प्रशासन मात्र पूर्णपणे झोपेत होते. अखेर नागरिकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी स्वतःच पाण्याच्या वॉलमधील गटारीचा गाळ काढून प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड केला.
याच गंभीर प्रकाराची दखल घेत आझाद नायक न्यूजने काल जोरदार बातमी प्रसारित केली आणि त्याचा जबरदस्त इम्पॅक्ट आज पाहायला मिळाला!
👉 आज सकाळपासूनच नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी धाव घेत
👉 गटारी साफसफाई व गाळ काढण्याच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात
👉 अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे अखेर सुरू
नागरिकांच्या आक्रोशानंतर आणि माध्यमांच्या ताकदीमुळे प्रशासन हलले, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
“मीडिया बोलला की प्रशासन धावलं!”
तरीही नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,
👉 केवळ तात्पुरती साफसफाई नको
👉 कायमस्वरूपी उपाययोजना करा
👉 अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन उभारले जाईल
राजाराम नगरमधील ही घटना म्हणजे प्रशासनाला दिलेला ठोस इशारा असून,
आझाद नायक न्यूजने पुन्हा एकदा जनतेचा आवाज बुलंद केला आहे! 🚨
0 Comments