Header Ads Widget

Responsive Image

३०१ गाईचे तुपाचे दिवे लावुन महाआरतीने सांगता करून मानव कल्याणाचा संकल्प....

अकोला :- आझाद नायक :- मुकेश भावसार
भक्ती श्रद्धा विश्वास तसेच मानवता परंपरा, संस्कृती चा संगम करून नक्षत्र वार लक्षात घेऊन आज रोहिणी नक्षत्र कृतिका नक्षत्र तसेच स्कंदमाता, कात्यानी माता लक्ष्मी पंचमी हा योग साधून तसेच सोमवार नवरात्राच्या राम प्रगट उत्सव निमित्त दक्षिण भारतातील बद्रीनाथ धाम म्हणून प्रसिद्ध 228 वर्ष प्राचीन तपशी बाबा राम मंदिरात ३०१ दिवे गाईच्या तुपाचे लावून श्री जानकी वल्लभो धर्मार्थ संस्था श्री रामदेव बाबा सेवा समितीने कार्यक्रम महाआरतीने सांगता करून मानव कल्याणाचा संकल्प व सर्वांचा कल्याण होऊ ही भावना प्रगट करण्यात साठी आराधना करण्यात आली. 
सतत अकोला पंचकोशीमध्ये श्री जानकी वल्लभो धर्मात संस्था व रामदेव बाबा सेवा समिती तर्फे विविध कार्यक्रम राखण्यात येतात राम प्रकट उत्सव निमित्त विविध कार्यक्रम करण्यात येत आहे त्यानिमित्ताने 228 वर्ष जुने बद्रीनाथ राम तसेच राम दरबारासह शालिग्राम स्वयंभू हनुमान मंदिर असलेल्या तसेच पाच पवित्र वृक्ष गौशाला असलेल्या दगडी पूल येथील अनेक संत महात्म्यांच्या पवित्र पावन स्पर्शाने भूमीमध्ये दीपदान महाआरती करण्यात आली.
समितीचे गिरीश जोशी गिरीराज तिवारी तसेच महेश्वरी समाजाचे सक्रिय पदाधिकारी कुंजबिहारी जाजू, पुष्पाताई रमेश वानखडे, संगीता ताई मागटे पाटील रुक्मिणी ताई पुरी, राम पांडे, राम ठाकूर रोहित तारकस, रमेश लड्डा, प्रशांत भैय्या लोहिया, एडवोकेट प्रमोद अग्रवाल मनीषा अग्रवाल सतीश गोयंका संतोष गोयंका, माधव मानकर, आशा गोयंका, अजय गुल्हाने, राम रतन सारडा, सुरेश ढोले , अनुसया जाजू, यावेळी धनराजजी पांडे मंगलाताई पांडे अनिताताई पांडे, श्री पांडे, आदित्य पांडे ,श्रद्धा दुबे, वेदांत दुबे, विनोद शर्मा, संगीता गावंडे यांनी सक्रिय सहभाग घेतला. 
यावेळी मंगलादीदी पांडे यांनी मंदिराचे महत्त्व तसेच महाआरती तसेच विशेष प्रार्थना त्यांच्या पुरोहितोत्वाने करण्यात आली. 
राम प्रकट उत्सव मध्ये मातृ शक्तीच्या शुभ असते विशेष पूजा अर्चना करण्याची परंपरा श्री जानकी वल्लभो धर्मार्थ संस्थेने कायम ठेवली आहे. 
परिसरात गोसेवा गौशाला तसेच वड, पिंपळ , बेलपत्र, औदुंबर नारळ केळे, यांचे वृक्ष असून त्याची तिथे सुद्धा दीपदान करण्यात आले. तसेच इथे पाचशे वर्षे जुनी विहिरीचे सुद्धा पूजन करण्यात आले स्वयंभू हनुमानाची तसेच शितलामाता जुने शालिग्राम मंदिर तसेच चारधाम पैकी बद्रीनाथ भगवानाची विशेष पूजा अर्चना तसेच राम दरबार ची विशाल चार फुटाची मूर्ती असून अकोला शहरातील 228 वर्ष जुने या मंदिरात विशेष नक्षत्र विशेष पूजा अर्चना करण्यात आली.
अकोला शहरातील प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरांच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये विघ्न येणार नाही तसेच ती परंपरेला भक्तांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने नियोजन करून मंदिराच्या एक हजार स्केअर फुट एरियामध्ये कोणताही कार्यक्रम न करता भक्ती आणि विश्वासासोबत सोबत प्रवचन तसेच विविध कार्यक्रम त्या कार्यक्रमाचे महत्त्व त्या जागेचे महत्त्व कायम राहण्याच्या दृष्टीने कार्यक्रम शहरांमध्ये विविध ठिकाणी करण्यात येत आहे. 
राम प्रगट उत्सव निमित्त मातृ शक्ती यांच्या हस्ते विशेष पूजा अर्चना करण्याची परंपरा श्री जानकी वल्लभो धर्मार्थ संस्था व रामदेव बाबा सेवा समितीने यंदाही जोपासली.

Post a Comment

0 Comments