शालार्थ आयडी घोटाळा: मोठा मासा जाळ्यात!
नाशिकमध्ये गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात आता मोठी कारवाई झाली असून, ऍड. किरण अजबराव पाटील यांना गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केली आहे. या प्रकरणाने संपूर्ण प्रशासनात खळबळ उडाली आहे.
आज कोर्टात हजर केल्यानंतर न्यायालयाने ऍड. किरण पाटील यांना 4 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
घोटाळ्यातील ‘महत्वाचा खेळाडू’ अटकेत!
शालार्थ आयडी घोटाळ्यात ऍड. किरण पाटील हा मुख्य सूत्रधारांपैकी एक असल्याचे समोर येत आहे. तपासादरम्यान त्यांच्याकडून अनेक धक्कादायक माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे.
पुरावे नष्ट करण्यामागे मोठा हात!
या घोटाळ्यातील महत्वाचे
नष्ट करण्यात किरण पाटील यांचा मोठा सहभाग असल्याचा आरोप आहे. तसेच शरद शिंदे, डी.डी. पाटील, मनोज पाटील यांच्या कोट्यवधींच्या लूटप्रकरणातही त्यांचा हात असल्याचे तपासात उघड होत आहे.
बनावटगिरीचा मोठा रॅकेट उघडकीस!
बोगस शिक्के नकली शालार्थ आयडी बनावट
तपासाची सूत्रे पीआय रामदास शेळके यांच्या हाती
गुन्हा अन्वेषण विभागाचे पीआय रामदास शेळके या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
1500 हून अधिक आरोपींचा समावेश!
या घोटाळ्यात बी.बी. चव्हाण, नितीन बच्छाव यांच्यासह तब्बल 1500 आरोपी असल्याचे समोर आले आहे.
पुरावे जमा करण्यासाठी नागरिकांचा पुढाकार
या प्रकरणाचा तपास करत अनेकांनी पोलिसांना कागदपत्रे व ठोस पुरावे उपलब्ध करून दिले आहेत, त्यामुळे तपासाला वेग आला आहे.
आता प्रश्न एकच — अजून किती मोठे चेहरे उघड होणार ?
शालार्थ आयडी घोटाळ्याचे दिवसेंदिवस खोलवर जात असून, येत्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
0 Comments