Header Ads Widget

Responsive Image

अमळनेर नगरपालिका चे उप-नगराध्यक्ष मा. श्री. प्रशांत दादा निकम यांचा मुबंई येथे सत्कार..

अमळनेर :- आझाद नायक न्युज विकी भावसार,पंकज भावसार 
आज अमळनेर नगरीसाठी अत्यंत अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण ठरला. अमळनेर नगरपालिका चे उप-नगराध्यक्ष मा. श्री. प्रशांत दादा निकम यांचा, दिनांक 30/03/2026 रोजी, मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार(गट) तर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. 
हा सन्मान मा. प्रदेशाध्यक्ष तथा आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, ही अमळनेरकरांसाठी गौरवाची बाब आहे.

प्रशांत दादांचे नेतृत्व हे केवळ पदापुरते मर्यादित नसून ते दूरदृष्टी, प्रभावी नियोजन,गुणवत्तापूर्ण काम आणि ठोस अंमलबजावणी यांचे उत्तम उदाहरण आहे.
 स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांनी विकासाभिमुख राजकारणाची नवी दिशा दिली आहे. 
प्रशासकीय कामकाजावरील मजबूत पकड, जनसामान्यांच्या प्रश्नांबाबतची संवेदनशीलता, सर्वसामान्य जातेशी असलेली नाळ, आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा ही त्यांची कार्यशैली विशेष उल्लेखनीय आहे.

अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रगतीसाठी त्यांचे योगदान वर्तमान काळात आणि भविष्यात सुद्धा निश्चितच मोलाचे ठरणार आहे.

माननीय प्रशांत दादा म्हणजे उच्च शिक्षित इंजिनिअर,वकील, आणि एक अनुभवी बिल्डर आहेत. 

प्रत्येक कामात त्यांचे क्वालिटीला महत्व असते. 

सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या कामात धडपड असते. 
एक नियोजनबध्द टीम वर्क करून, सर्वांना सोबत घेऊन काम करणारा माणूस म्हणजेच प्रशांत दादा निकम  
कोणतीही समस्या घेऊन त्यांच्या पर्यंत गेले, म्हणजे ती त्याच क्षणाला सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न त्यांचा असतो. 
 प्रशासनात काम करून घेताना , सर्वांशी आदराने, प्रेमाने आणि शिस्तीने वागणारे नेतृत्व म्हणजे प्रशांत दादा निकम.
 अमळनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ,परिवर्तनातून समृद्धीकडे या बोधवाक्यावर चालणारे नेतृत्व म्हणजे प्रशांत दादा निकम. 
एक प्रामाणिक, विनम्र आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणजे प्रशांत दादा निकम . 

 त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! 


Post a Comment

0 Comments