Header Ads Widget

Responsive Image

जिल्हा स्तरावर जिल्हा पुरवठा कार्यालयात तक्रार निवारण कक्ष" स्थापन..संपर्क साधण्याचे आवाहन

घरगुती गॅसबाबत तक्रार निवारणा साठी पुरवठा कार्यालय कक्ष स्थापन
अकोला, दि. २९ :- आझाद नायक न्युज,मुकेश (विकी) भावसार
  जिल्ह्यातील घरगुती एलपीजी गॅसच्या सुरळीत वितरणा करिता, तसेच घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्याकरिता जिल्हा स्तरावर दक्षता व फिरत्या पथकाद्वारे तपासण्या होत आहेत. त्याचप्रमाणे, जिल्हा स्तरावर जिल्हा पुरवठा कार्यालयात तक्रार निवारण कक्ष" स्थापन करण्यात आला आहे. 
त्याचा संपर्क क्र. 8010153780 हा आहे. सद्य: स्थितीमध्ये पेट्रोल,डिझेल, व घरगुती गॅस या इंधनासंदर्भात प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने अकोला जिल्ह्यातील नागरिकांकडून दूरध्वनी संदेशाद्वारे प्राप्त होणा-या तक्रारींचे निवारण करण्यासाठी हा कक्ष स्थापण्यात आला आहे. तक्रार निवारण कक्षामध्ये अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
        पुरवठा अधिकारी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, गॅस एजन्सीमध्ये अनावश्यक गर्दी करू नये. गॅस सिलेंडरबाबत आपणास काही अडचण /समस्या असल्यास हेल्पलाईन क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी. आपल्या तक्रारीचे निराकरण करण्यात येईल.  हेल्पलाईन क्र. 8010153780 हा आहे. 

 

Post a Comment

0 Comments