“अमळनेर जळतंय… आणि नगरपरिषद बेंबी चोळतंय..
अमळनेर शहरासाठी ही केवळ धक्कादायक नाही, तर लाजिरवाणी आणि संतापजनक बाब समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्ते परेश उदेवाल यांच्या तक्रारीनंतर नगरपरिषदेकडून सादर करण्यात आलेल्या अधिकृत खुलाशात उघड झाले आहे की – अमळनेर नगरपरिषद अग्निशमन विभागात एकही फायरमन कार्यरत नाही!
म्हणजे स्पष्ट शब्दांत सांगायचं तर – शहरात आग लागली, तर वाचवायला कोणीच नाही!
“नियम फक्त कागदावर… प्रत्यक्षात शून्य व्यवस्था!”
शासनाच्या नियमांनुसार अग्निशमन विभागात प्रशिक्षित फायरमन असणे बंधनकारक आहे. मात्र अमळनेर नगरपरिषदेत वर्षानुवर्षे ही पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत.
ना भरती… ना प्रशिक्षण…ना कोणतीही पर्यायी व्यवस्था!
“ही निष्काळजीपणा नाही, हा गुन्हाच!”
लाखो लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनसारखी अत्यावश्य सेवा पूर्णपणे ठप्प असणे, हे दुर्लक्ष नसून नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्या सारखे आहे.
“नगरपरिषद की खेळघर?”
अत्यावश्यक सेवांकडे पूर्ण दुर्लक्ष करून प्रशासन नेमकं काय करतंय?
फक्त कागदोपत्री कामं आणि दिखावा करून नागरिकांची फसवणूक चालली आहे का?
अमळनेरकरांच्या सुरक्षेचा प्रश्न प्रशासनासाठी इतका गौण का?
नागरिकांचा संताप उफाळला!
ही माहिती समोर येताच शहरात संतापाची लाट उसळली आहे.
“आग लागली तर आम्ही
विझवायची का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
आता थेट मागण्या – नाहीतर आंदोलन ठरलेच!
तात्काळ फायरमन पदांची भरती करा
प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा
अग्निशमन विभाग पूर्णपणे सज्ज करा
जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा
थेट इशारा:
जर प्रशासनाने अजूनही डोळेझाक केली, तर अमळनेरकर रस्त्यावर उतरतील आणि तीव्र आंदोलन उभारतील.
यावेळी फक्त बातम्या नाहीत… तर प्रशासनाला जागं करणारा मोठा आवाज उठणार आहे!
0 Comments