Header Ads Widget

Responsive Image

अमळनेर शहरातील राजाराम नगर परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्थे चा पूर्णपणे बोजवारा.

अमळनेर :- आझाद नायक न्युज
  विकी भावसार, परेश उदेवाल

आज ‘१२ दिवसांनी पाणी, ७ दिवस कोरडे’ – राजाराम नगर वेठीस; नव्या पाईपलाईनचीही फसगत, नागरिकांचा संताप टोकाला
 अमळनेर शहरातील राजाराम नगर परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्थे चा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. आधीच १२ दिवसांनी पाणी आणि त्यानंतर ७ दिवस कोरडे असा अजब कारभार सुरू असताना, आता नव्याने जोडलेल्या पाईप लाईननेही पहिल्याच परीक्षेत दगा दिल्याने नागरिकांचा संताप उफाळून आला आहे.शनिवार रोजी पाणी सोडण्यात आले असता, नुकतीच जोडलेली पाईपलाईन जॉइंटमधून निखळल्याची धक्कादायक घटना घडली.
  या प्रकारामुळे “हे काम दर्जाहीनच नव्हे तर बेफिकीर आणि हलगर्जी पद्धतीने करण्यात आले आहे” असा संतप्त आरोप नागरिकांकडून होत आहे.
पाणीपुरवठा विभागावर संतप्त हल्लाबोल – 
बेफिकीरपणाचा कळस :
पाणीपुरवठा कर्मचारी,अभियंते आणि नियोजन करणारे अधिकारी पूर्णपणे निष्क्रिय. “काम करा किंवा खुर्ची सोडा” अशी थेट भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
नियोजनाचा फज्जा :
१२ दिवसांनी पाणी देणे आणि पुन्हा आठवडाभर गायब होणे – हा प्रकार सरळसरळ अपयशी नियोजनाचे उदाहरण.
 पाईपलाईनचा खेळखंडोबा :
नवीन पाईपलाईन अर्धवट, निकृष्ट आणि तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आल्याचा आरोप. एका बाजूला उंच, दुसऱ्या बाजूला खाली त्यामुळे प्रेशर कोसळते.
  नवीन धक्कादायक प्रकार : “थूक लावून चिटकवण्यासारखे काम”
नुकतीच जोडलेली पाईपलाईन जॉइंटमधून निघून जाणे ही केवळ चूक नसून गंभीर निष्काळजीपणाचे लक्षण.
“हे काम इतक्या हलक्या दर्जाचे आहे की जणू थूक लावून चिटकवले आहे,” असा संतप्त आरोप स्थानिकांकडून.
 दूषित पाण्याचा धोका :
गटारमिश्रित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ.
हद्दीबाहेर म्हणून दुय्यम वागणूक? :
राजाराम नगर हा भाग जाणीवपूर्वक दुर्लक्षित ठेवल्याचा ठाम आरोप.
 जबाबदारी झटकण्याची सवय :
समस्या गंभीर असतानाही अधिकारी “झोपेचे सोंग” घेत असल्याची टीका.
 फील्ड स्टाफची मनमानी :
फिटर व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसून नागरिकांच्या तक्रारींकडे सरळ दुर्लक्ष.
  नागरिकांचा इशारा – “आंदोलन आता अटळ”
राजाराम नगरमधील नागरिकांनी आता संघर्षाचा पवित्रा घेतला असून “पाणी हा आमचा हक्क आहे, उपकार नाही” असा स्पष्ट इशारा दिला आहे. मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
प्रशासनाला थेट सवाल
 किती दिवस नागरिकांना असेच वेठीस धरले जाणार?
दूषित पाण्याला जबाबदार कोण?
निकृष्ट पाईपलाईन कामावर कारवाई कधी?
 आणि सर्वात महत्त्वाचे – नियमित, स्वच्छ पाणीपुरवठा कधी सुरू होणार?
‘झोपलेले प्रशासन की पेटलेली जनता?’
राजाराम नगरमधील परिस्थिती आता गंभीर टप्प्यावर पोहोचली आहे. नव्याने केलेल्या कामातही उघड झालेली हलगर्जी ही प्रशासनासाठी धोक्याची घंटा आहे.
जर तात्काळ हस्तक्षेप करून बेजबाबदारांवर कठोर कारवाई केली नाही, तर अमळनेरमध्ये नागरिकांचा रोष मोठ्या आंदोलनात परिवर्तित होण्याची प्रशासन वाट बघत आहे का ? 
जनतेच्या ठेवलेल्या संयमाची परीक्षा घेऊ नका.

Post a Comment

0 Comments