विकी भावसार, परेश उदेवाल. आझाद नायक न्यूजच्या बातमीचा जबरदस्त दणका अखेर प्रशासन धावले – अखेर भागवत रोडवर अतिक्रमण हटवण्यास सुरुवात
शहरातील बस स्टँडसमोरील भागवत रोडवरील अतिक्रमणाचा प्रश्न चव्हाट्या वर आणणारी बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाने अक्षरशः धाव घेतली अनेक दिवसांपासून नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन अखेर अॅक्शन मोडमध्ये आले असून तात्काळ कारवाई सुरू करण्यात आली आहे.
क्षणात बदलले चित्र:
बातमी लागताच संबंधित विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि रस्त्यावर पसरलेले अनधिकृत अतिक्रमण, डिजिटल होल्डिंग व अडथळे हटवण्याचे काम युद्धपातळी वर सुरू झाले.
शाळकरी मुलांच्या जीवाशी सुरू असलेला धोकादायक खेळ थांबवण्या साठी ही कारवाई निर्णायक ठरत आहे.
नागरिकांचा आवाज ठरला प्रभावी: “माध्यमांनी आवाज उठवला आणि प्रशासन हलले!”
अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत असून या कारवाईमुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुख्याधिकारी यांचे विशेष आभार: प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन वेगाने कारवाई सुरू केल्याबद्दल मुख्याधिकारी यांचे नागरिकांकडून मनापासून आभार व्यक्त केले जात आहेत.
इशारा स्पष्ट: ही कारवाई अर्धवट न राहता पूर्णपणे अतिक्रमण हटवून भागवत रोड कायमस्वरूपी “अतिक्रमणमुक्त” करावा, अन्यथा पुन्हा आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
संदेश स्पष्ट – बातमीची ताकद काय असते, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले!
0 Comments