Header Ads Widget

Responsive Image

अमळनेरच्या राजकीय नेत्यांच्या आपसी वादामुळे अमळनेरकरांचे हाल प्रशासनाचा सर्वच विभागाचा भोंगळ कारभार...जनतेचे आरोग्य रामभरोसे

अमळनेर :- आझाद नायक न्युज
विकी भावसार,परेश उदेवाल
अमळनेर ग्रामीण रुग्णालय बनले रेफर केंद्र..जनतेचा आरोग्याशी खेळ..जनतेचे आरोग्य राम भरोसे
  अमळनेर ग्रामीण रुग्णालयात ‘रेफर’ करण्याचा धुमाकूळ! रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू? 
 गरिब रुग्णांची परवड; प्रसूती महिलांनाही धुळे-जळगावला पाठवण्यावरून संताप, आंदोलनाचा इशारा! 
अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सध्या गंभीर प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडला असून, रुग्णांना विनाकारण धुळे व जळगाव येथे ‘रेफर’ करण्याच्या प्रकारामुळे संतापाची लाट उसळली आहे.  नगरसेवक नविद शेख यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत वैद्यकीय अधीक्षकांना खरमरीत निवेदन सादर केले आहे. परिस्थिती तात्काळ सुधारली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. 
उपचाराऐवजी ‘रेफर’चा शॉर्टकट ?
रुग्णालयात आवश्यक सुविधा, तज्ञ डॉक्टर उपलब्ध असतानाही रुग्णांवर प्राथमिक उपचार न करता त्यांना थेट धुळे किंवा जळगाव येथे पाठवले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. 
यामुळे गरीब रुग्णांना आर्थिक फटका बसत असून मानसिक ताणही सहन करावा लागत आहे. 
प्रसूती महिलांच्या जीवाशी खेळ ?
विशेषतः प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना तातडीने बाहेर पाठवले जात असल्याने मोठा धोका निर्माण होत आहे. 
प्रवासा दरम्यान माता व बालकाच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जबाबदारी टाळण्याचा प्रकार ?
“रुग्णालयात सर्व सुविधा असूनही रुग्णांना बाहेर पाठवणे म्हणजे वैद्यकीय सेवेतील हलगर्जीपणा आहे,” असा थेट आरोप करण्यात आला आहे. 
 उपचारात निष्काळजीपणा झाल्यास किंवा जीवितहानी झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी वैद्यकीय अधीक्षकांवर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. 
आंदोलनाचा इशारा !
 प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष न दिल्यास, आगामी काळात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा नगरसेवक नविद शेख यांनी दिला आहे. 
राजकीय नेते गप्प का ?
स्थानिक नागरिकांमध्ये एकच प्रश्न उपस्थित होत आहे —
“इतक्या गंभीर प्रश्नावर राजकीय नेते मंडळी मौन का बाळगत आहेत?” गरिबांच्या आरोग्याशी संबंधित हा विषय असूनही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे. 
 जर ही परिस्थिती अशीच सुरू राहिली, तर सामान्य जनतेचे आरोग्य ‘राम भरोसे’ राहणार का? 

Post a Comment

0 Comments