Header Ads Widget

Responsive Image

अमळनेरमध्ये वाईन शॉप समोरच उघड्यावर पोलीस चौकी जवळ व मोकळ्या जागेत दारू पिणाऱ्यांचा उच्छाद....परिसरातील नागरिक त्रस्त प्रशासन मस्त...

अमळनेर :-    विकी भावसार, 
                             परेश उदेवाल 
 शहरात बियर बार, देशी दारू दुकानात दारू पिण्यासाठी बैठक व्यवस्था असतांना शहराच्या मध्यवर्ती भागात कायदा-सुव्यवस्थेची अक्षरशः धज्ज्या उडाल्याचे चित्र समोर येत असून, गांधलीपुरा पोलीस चौकी जवळच भर रस्त्यावर रोज उघड्यावर दारू पार्ट्यांचा उच्छाद सुरू आहे.
  दारू दुकानासमोरच मद्यपींचे टोळके रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर बसून दारू पितात, आरडाओरडा करतात आणि संपूर्ण परिसर दहशतीत ठेवतात.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, महिलांच्या ये-जा असलेल्या मुख्य मार्गावरच हा प्रकार सुरू असल्याने महिलांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. नागरिक संतप्त होऊन विचारत आहेत.
पोलीस प्रशासन नेमकं करतंय तरी काय ?
 चौकी काही अंतरावर असतानाही हे प्रकार उघडपणे सुरू असणे म्हणजे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा करत आहे.
दरम्यान, साने गुरुजी कॉम्प्लेक्स (अर्बन बँक समोर) 
येथेही मोठ्या प्रमाणावर दारू पार्ट्यांचा अड्डा तयार झाल्याचे समोर आले आहे. येथेही रात्रीच्या वेळी मद्यपींची गर्दी होत असून परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
  तसेच 80 फुटी रोड,बोरी नदी पात्रात संत सखाराम महाराज यांच्या समाधी जवळ हे दारू पिणारे सर्रासपणे दारू,गांजा पितात यावर अंकुश लावणे महत्वाचे आहे.
नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण असून, आज नाही तर उद्या मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चिंता व्यक्त होत आहे. तरीसुद्धा पोलीस प्रशासन मात्र अजूनही सुस्त अवस्थेत असल्याचा आरोप होत आहे.
 आता प्रश्न एकच —
पोलीस प्रशासनाला जाग येणार कधी?
की एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच कारवाई होणार का ?
शहरातील नागरिकांनी तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली असून अन्यथा आंदोलनाचा इशाराही परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments