अमळनेर | प्रतिनिधी :- परेश उदेवाल
अमळनेर शहरातील राजाराम नगर परिसरातील नागरिक सध्या पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकत आहेत. गेल्या दहा दिवसांपासून परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांचे हाल होत असून प्रशासनाच्या निष्काळजी व भोंगळ कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
राजाराम नगरमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. विशेषतः महिलांवर आणि ज्येष्ठ नागरिकांवर याचा मोठा परिणाम होत असून त्यांना दररोज पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी टँकरचीही योग्य व्यवस्था करण्यात आलेली नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, वारंवार तक्रारी करूनही नगरपरिषद प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही. पाणीपुरवठा विभागाकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही.
या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांना नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची मागणी जोर धरत आहे. सामाजिक कार्यकर्ता व आमचे आझाद नायक न्युज चे प्रतिनिधी परेश रवींद्र उदेवाल यांनी
मुख्याधिकारी गणेश जी शिंदे साहेब व पाणीपुरवठा इंजिनियर यांच्याशी दूरध्वनी द्वारे संपर्क केला असता उडवा उडवीचे उत्तरे देण्यात आली.
0 Comments