Header Ads Widget

Responsive Image

अकोला जिल्हा कुस्तीगीर संघाच्या निवड चाचण्या अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या...

आझाद नायक :- मुकेश भावसार 
 आज दिनांक ८ मार्च २०२६ रोजी मातोश्री वृद्धाश्रम, खडकी (अकोला) येथे अकोला जिल्हा कुस्तीगीर संघाच्या निवड चाचण्या अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन जिल्हा संघटनेचे सचिव विदर्भ केसरी पैलवान श्री युवराज भाऊ गावंडे यांनी केले. त्यांनी केलेले नियोजन इतके सुबक व शिस्तबद्ध होते की कार्यक्रमाची व्यवस्था पाहून सर्व उपस्थितांना विशेष समाधान वाटत होते.
या निवड चाचण्यांना अकोला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून कुस्तीगीरांचा भरघोस प्रतिसाद लाभला. स्पर्धेत एकापेक्षा एक अशा रंगतदार व प्रेक्षणीय कुस्त्या पाहण्याचा आनंद उपस्थित कुस्तीप्रेमींना मिळाला.
या कार्यक्रमाला अकोला जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पैलवान श्री चंदू दादा शिरसाट तसेच कार्याध्यक्ष विक्रम गोसावी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोळा चौक व्यायामशाळेचे जुने मल्ल व नुकतेच महानगरपालिकेतून निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक पैलवान श्री नितीन भाऊ ताकवले, तसेच श्री धीरज भाऊ सरोदे, श्री गौतम भाऊ गवई आणि जुने मल्ल शेरा पैलवान उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष पैलवान श्री संतोष भाऊ गवई, पैलवान श्री प्रकाश भाऊ शिरसाट, पैलवान श्री संतोष भाऊ पाचपोर, तसेच जिल्हा संघटनेचे सहसचिव पैलवान श्री राजेश भाऊ नेरकर, पैलवान श्री कृष्णा भाऊ मिश्रा, पैलवान श्री प्रशांत भाऊ जंजाळ, पैलवान श्री रवी भाऊ मुळे, पैलवान श्री अनिल भाऊ कांबळे 
तसेच संघटनेचे सदस्य पैलवान श्री पप्पू भैया मिश्रा, पैलवान श्री सौरभ खंडारे, पैलवान श्री संदीप भाऊ काटकर, पैलवान श्री संग्राम भाऊ शिरसाट, पैलवान श्री सौरभ शिरसाट, पैलवान श्री अमित भाऊ भोजने, पैलवान श्री गणेश भाऊ श्रीनाथ आणि पैलवान श्री सुरेश भाऊ श्रीनाथ यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अधिक यशस्वीरीत्या पार पडला.
यावेळी आजचा दिवस ‘जागतिक महिला दिन’ असल्यामुळे संघटनेची संपूर्ण राज्यातील सर्वात लहान पंच म्हणून ओळख असलेली कुमारी जानवी राजेश नेरकर हिचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच कार्यक्रमाला पोळा चौक व्यायामशाळेचे जुने मल्ल व गुरु डॉ. खोरे वस्ताद यांचे शिष्य पैलवान श्री संजय भाऊ अकोटकर, श्री कमलेश भरणे आणि श्री कुणाल दादा काळे यांनी सदिच्छा भेट देऊन कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल स्तुतीसुमने अर्पण केली. तसेच विदर्भ केसरी पैलवान युवराज भाऊ गावंडे यांच्या नेतृत्वाखाली कुस्तीची अधिक भरभराट व्हावी, अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली.
अशा प्रकारे अकोला जिल्हा कुस्तीगीर संघाच्या निवड चाचण्या अत्यंत यशस्वी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या.

Post a Comment

0 Comments