ध्येय निश्चिती, प्रामाणिक प्रयत्न व आत्मविश्वास यशस्वीतेचे त्रिसूत्र-प्राचार्य डॉ. रविन्द्र सोनवणे
अमळनेर :- आझाद नायक न्युज मुकेश भावसार
खान्देश शिक्षण मंडळ संचलीत स्व.पं. छ.भांडारकर व र का केले औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात शै. वर्ष २०२५-२६ मध्ये पदविका व पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विध्यार्थ्यांसाठी RxVibez-2026 स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. आपल्या अध्यक्षिय भाषणात डॉ. रविन्द्र सोनवणे यांनी, स्वामी विवेकानंद, डॉ. ए.पी. जे अब्दुल कलामसाहेब, रतनजी टाटा यांचे विचार व त्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी केलेले संघर्ष सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
फार्मसी महाविद्यालयातील प्रा. अनिल बोरसे, प्रा. देवेश भावसार, प्रा. छाया महाजन, प्रा. शिवानी शर्मा व द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर करीत आपला परिचय करुन दिला.
महाविद्यालयातील प्रा. अनिल बोरसे, प्रा. देवेश भावसार, प्रा. छाया महाजन, प्रा. शिवानी शर्मा, प्रा. हर्षदा पवार, प्रा. मानसी उपासनी, प्रा. प्रियांका महाजन, प्रा. वैशाली कुळकर्णी, प्रा. गितांजली पाटील, प्रा. प्रगती पाटील, प्रा. स्वप्नाली महाजन, प्रा. सतिष ब्राम्हणे, प्रा. प्रफुल चव्हाण, प्रा. प्रितम पाटील कार्यालयीन अधिक्षक श्री. अनिल महाजन व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेहभोजनाचे उत्तम सुनियोजन, व यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
या निमीत्ताने, तज्ञ परीक्षकांनी RxVibez-2026 सर्वोत्कृष्ट विद्यार्थी व विद्यार्थिनी" यांची निवड करुन त्यांना प्राचार्यांच्या हस्ते मुकुट प्रदान करुन गौरविण्यात आले. तसेच शैवर्ष २०२४-२५ मधे घेण्यात आलेल्या वार्षिक परीक्षेत प्रथम आलेले विद्यार्थी, जीपॅट स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी, विवीध क्रिडा स्पर्धेतील विजेते यांचा स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन प्रा. शिवानी शर्मा, द्वितीय वर्षाचे विद्यार्थी व आभार प्रदर्शन प्रा. छाया महाजन यांनी केले. सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राचार्य व सर्व कर्मचारी यांनी विवीध गाण्यांच्या तालावर जल्लोष करुन कार्यक्रमात नवचैतन्य आणले. शेवटी वंदेमातरमाने कार्यक्रमाची सांगता झाली.
खान्देश शिक्षण मंडळाचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष सीए निरज अग्रवाल, कार्योपाध्यक्ष श्री. जितेंद्र जैन, ज्येष्ठ संचालक श्री योगेश मुंदडे, सचिव प्रा. पराग पाटील व सर्व पदाधिकारी यांनी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन अशाप्रकारचे कार्यक्रम भविष्यातही आयोजित करुन खा.शि. मंडळ व फार्मसी महाविद्यालयाची सांस्कृतिक व शैक्षणिक परंपरा सतत जोपासावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
0 Comments