व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणारे युवा व्यसनमुक्ती जनआंदोलन समिती महाराष्ट्र या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व्यसनमुक्ती प्रचारक अमरदीप सदांशिव यांना नुकताच कला विष्कार साहित्य मंडळ मुर्तिजापूर द्वारा दिला जाणारा राज्यस्तरीय युवा व्यसनमुक्ती सेवा कार्य पुरस्कार गझल नवाज भीमरावजी पांचाळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला...
कलाविष्कार साहित्य व सांस्कृतिक मंडळ मुर्तीजापुर यांच्या वतीने एकलव्य इंग्लिश स्कूल कानशिवणी जि अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय तिसरे मराठी साहित्य संमेलन सोहळ्यामध्ये झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक चिंतामण कांबळे, सिने अभिनेता स्वप्निल बोरकर, प्रा.डॉ.संतोष हुशे सर, विनोद पाटील सर, युवराज देवरे कार्याध्यक्ष जन ग्रामीण पत्रकार संघ,देवानंद अहिरे,मिलिंद इंगळे अध्यक्ष कलाविष्कार यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण सोहळा पार पडला...
अमरदिप सदांशीव यांनी व्यसनमुक्ती ची अकोला जिल्ह्यात एक चळवळ निर्माण केली असून व्यसनमुक्ती जनजागृती चे विविध प्रयोग संस्थेच्या माध्यमातून केले आहेत म्हणून त्यांच्या व्यसनमुक्ती च्या कार्याची दखल घेऊन त्यांना व्यसनमुक्ती सेवा कार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, अमरदीप सदांशिव हे व्यसनमुक्तीचे कार्य ऋषिकेश झीने,राहुल तायडे, प्रवीण वाहूरवाघ, सचिन शिरसाठ, गोकुळ वाहूरवाघ, संदीप देशमुख,यांच्या सहकार्याने उपक्रम राबवीत असतात.
0 Comments