Header Ads Widget

Responsive Image

अकोला अंगणवाडी मदतनीसच्या फॉर्मची जादा दराने विक्री.... महिलांची आर्थिक लुट

अकोल्यात अंगणवाडी मदतनीस च्या फॉर्म भरणाऱ्या उमेदवारांची जादा किंमतीने फॉर्म विकून आर्थिक लुट....
अकोला :- मुकेश भावसार 
सध्या महिला बालविकास विभागाची अंगणवाडी मदतनिसच्या अकोला शहरात एकुण 26 जागा रिक्त असुन या जागेसाठी 13 मार्च शेवटची तारीख असुन रोज शेकडो उमेदवार माता - भगिनी विधवा, परितक्त्या, महिला दुरून दुरून  फॉर्म भरण्यासाठी येत असुन 4 पानाच्या फॉर्मची किंमत 10 रुपये होतात तर 20 रुपये उमेदवार यांच्याकडून घेतले जात आहेत. आणि तेही महिला बालविकासच्या ऑफिस खाली अभ्यासिका येथे व राजेश्वर झेरॉक्स येथे या फॉर्मची जादा दराने विक्री करून आर्थिक लुट करीत आहे. तरी अश्या जादा दराने विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे .

Post a Comment

0 Comments