Header Ads Widget

Responsive Image

दहिहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी पत्रकाराला अश्लिल शिवीगाळ करून खोटे गुन्हा दाखल करण्याची दिली धमकी.

 दहीहंडा परिसरात ठाणेदारांच्या आशीर्वादाने अवैध धंद्या वाल्यांची चलती......

जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे केली तक्रार

 अकोला:- आझाद नायक न्युज, संपादक,मुकेश भावसार  एकीकडे पत्रकारांना धमकी देणे, धमकावणे विषयी कायदा पास झाला असतां ना अकोल्यातील कायद्याचे रक्षकच दुसऱ्या रक्षकाचे भक्षक झाल्याचे चित्र अकोला जिल्ह्यात पाहायला  मिळाले...
जिल्ह्यातील दहीहंडा पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे, वरली मटका, गुटखा,रेती गोमांस, दारु, जुगार, तितली भवरा पेट्रोल  डिझेल खुले आम राजरोसपणे अनेक अवैद्य धंदे सुरू आहे .
म्हणजे दहिहाडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांची मिली भगत अर्थात ठाणेदारच्या आशिर्वादा ने अवैध धंदे सुरू आहे .अशी ‌खाञी व चौकशी करून पत्रकार पुर्णाजी खोडके यांनी अवैध धंदे या विषयावर बातमी प्रकाशित केली असता दहिहंडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत, यांनी पुर्णाजी खोडके यांना अश्लील शिविगाळ करुन खोटे गुन्हे दाखल करण्याची ‌धमकी दिली धमक्या, शिविगाळ सर्व रेकॉर्ड केलेलीं आहे ‌.शिविगाळ करुन धमकी दिली, या संबंधित पुर्णाजी खोडके यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांचेकडे दिनांक,८/३/२०२३ रोजी तक्रार दिली असून आज पञकार पुर्णाजी खोडके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकऑफीसध्ये चौकशि ‌केली असून जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी उपविभागीय पोलिसअधिकारी यांना चौकशी करून कारवाई करण्यात यावे असे निर्देश दिले आहेत,
 पञकार‌ हा एक देशाचा चौथा आधारस्तंभ आहे. पञकारांना जर‌ कर्तव्य बजावत असलेले ठाणेदार शिविगाळ व खोटे गुन्हे मध्ये फसविण्याचा धमक्या देत आहेत तर ठाणेदार हे कर्तव्यावर कसुर करत आहेत .असे दिसून येत आहे . तसेच ठाणेदार सुरेंद्र राऊत यांच्या विरोधात बरेच नागरिकांनी तक्रार दाखल केलेल्या असून पञकारानी सुद्धा तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार कायद्याचा उपयोग करून त्यांच्यावर कार्यवाही करावी तसेच त्यांच्या हद्दीमध्ये चालू असले ल्या अवैध धंद्यांवर वरिष्ठ पातळी वरून कार्यवाही करावी.

पत्रकारांना धमक्या देणे तसेच ठाण्यामध्ये रिपोर्ट देण्याकरता आलेल्या व्यक्तींना मारहाण करणे शिवीगाळ करणे असे अनेक प्रताप दहीहंडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे.या सर्व प्रकरणात काय कारवाई करतात या कडे सर्व जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे . पत्रकार पुर्णाजी खोडके यांना न्याय न मिळाल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा पञकार पूर्णजी खोडके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दीला आहे . तसेच माझ्या जीविताला कमी जास्त झाल्यास जिवीतहानी झाल्यास‌ याचे जबाबदार ठाणेदार सुरेंद्र राऊत ‌ यांना धरावे . तसेच पोलीस अधीक्षकाकडून न्याय न मिळाल्यास जिल्हा सत्र न्यायालय मध्ये सुद्धा 156/3 याचिका दाखल करणार‌ असल्याचे, त्यांनी सांगितले, तरी या सर्व प्रकरणावर संबंधित ठाणेदारावर जिल्हा पोलीस अधीक्षक काय कारवाई करणार याकडे संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकार नागरिकांचे लक्ष लागले आहे. न्याय न मिळाल्यास ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. 

Post a Comment

0 Comments