अकोला :- निर्भय बनो जन आंदोलन, सेवाश्री बहुउद्देशीय संस्था, आरोळी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शीटाकळी तालुक्या तील काजळेश्वर येथील श्रीसेवा गौशाळेमध्ये निस्वार्थपणे सेवा भावी वृत्तीने काम करणाऱ्या आदिवासी युवक, महिला, गौव सेवकाना त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना कपड्याचे वितरण करण्यात येऊन त्यांचा कार्याचा सन्मान करण्यात आला . यावेळी ज्येष्ठ समाजसेवक तथा निर्भय बनो आंदोलनाचे संयोजक गजानन हरणे, आरोळी संस्थेचे अध्यक्ष समाधान वानखडे, समाजसेविका कमलजीत कौर, गौशाळेचे अध्यक्ष रामराव चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते केलवीन सुबी, मोहम्मद साकिब यांच्या शुभहस्ते हे वस्त्रदान करण्यात आले.
यावेळी या गौशाळेची संपूर्ण माहिती घेऊन गौशाळेच्या प्रगतीसाठी संस्थेला शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच या गौशाळेच्या प्रगतीसाठी दानशूर लोकांनी आपले सत्पात्री दान देऊन सहकार्य करण्याचे आव्हान गौसेवक तथा संस्थेचे अध्यक्ष रामराव चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे केले आहे.
0 Comments